
देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांची रोजच लाखोंच्या संख्येनं गर्दी असते. विशेष म्हणजे, रोजच दानपेटीत किंवा बालाजीचरणी देखील भाविकांकडून लाखो-करोडोंमध्ये दान करतात. सोनं-चांदी, हिरे,यांसह मौल्यवान वस्तूंची भेट तिरुपती बालाजीच्या चरणी दिली जाते. तसंच आता आणखी एका भक्ताने केलेलं दान चर्चेचा विषय बनला आहे.
तिरुपती बालाजी मंदिरात चक्क 160 कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांचे दान
एका भाविकाने चक्क 160 कोटी रुपयांचं सोनं तिरुपती बालाजी मंदिरात अर्पण केल्याची माहिती आहे. या भाविकाच्या दानशूरपणावर सगळेच आश्चर्यचकित
झाले आहेत. देशभरातील श्रीमंत देवस्थान म्हणूनही या मंदिराकडे पाहिले जाते. आता, चेन्नईतील एका व्यापाऱ्याने तब्बल 121 किलो सोनं तिरुपती चरणी अर्पण केलं आहे. या सोन्याची बाजारभावानुसार किंमत 160 कोटी रुपये एवढी आहे.
तब्बल 121 किलो सोनं दान करणारा हा भक्त कोण?
तिरुपती बालाजी चरणी तब्बल 121 किलो सोनं दान करणाऱ्या उद्योगपतीचं नाव वर्धमान जैन असून त्यांनी हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) आणि ऑटोमेशन क्षेत्रात आपले उद्योग उभारले आहेत. प्रामुख्याने ‘अॅक्सेस हेल्थकेयर’ चे संस्थापक आणि माजी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. ही कंपनी हेल्थकेअर इंडस्ट्री टेक्नोलॉजी बेस्ड सर्व्हिसेज देते. आंध्र प्रदेश के मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि त्यांची पत्नी यांच्यासमवेत वर्धमान जैन यांनी आज 26 नवंबर 2026 रोजी तिरुपती चरणी तब्बल 121 किलो सोनं दान केलं. त्यामध्ये, तिरुपतीसाठी दागिने आणि मुकुट देखील दान केला आहे. आता, भगवान वेंकटेश्वर म्हणजेच तिरुपती बालाजीला 27 नवंबर रोजी हे दागिने परिधान केले जाणार आहेत.
शिक्षणासाठी अमेरिकेत, तिथेच उद्योग
वधर्मान जैन यांनी पहले चेन्नईतील लॉयोला कॉलेजमधून स्टॅटिक्सची पदवी घेतली आहे. त्यानंतर, ते अमेरिकेला गेले, तिथं राहून ऑस्टिनमधील टॅक्सास युनिव्हर्सिटीतून कॉप्यूटर साइंसची पदव्युत्तर पदवी घेतली. काही वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर वर्धमान जैन यांनी हेल्थकेअर टेक्नोलॉजी, मेडिकल कोडिंग, इमेज प्रोसेसिंग आणि रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशनमध्ये एक्सपर्टाइज प्राप्त केली आहे.
उद्योगविश्वाला 2025 मध्ये टर्निंग पॉईंट
जैन यांच्या उद्योगविश्वाला 2025 मध्ये टर्निंग पॉईंट मिळाला, जेव्हा त्यांनी आपल्या ‘अॅक्सेस हेल्थकेयर’ कंपनीत 70% हिस्सेदारी एका अमेरिकीन कंपनीला विक्री केली. जवळपास 2 अब्ज डॉलर एवढी ही डील होती. या मोठ्या आर्थिक करारामुळे वर्धमान जैन यांची कंपनी चर्चेत आली. तसेच, जैन यांच्या उद्योजकीय कारकिर्दीतलं हे मोठं यश मानलं जातं. यासह, ते आशिया चेन्नई इंजीनियरिंग आणि इतरही कंपन्यांशी जोडले गेले आहेत.









