डिलिमिटेशन विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी! माञ विरोधकांचा आक्षेप, विकासाच्या नावाखाली लूट होण्याची शक्यता

भारतीय राजकारणाची दिशा बदलणारा एक अत्यंत मोठा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. सर्वप्रथम, डिलिमिटेशन म्हणजे जाणून घेऊ. डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना. सोप्या भाषेत सांगायचे तर, देशातील लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि प्रतिनिधित्वाचा विचार करून लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या सीमा निश्चित करणे किंवा त्यांची संख्या बदलणे म्हणजे डिलिमिटेशन.

महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्यात आलं

या प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयकातील सर्वात मोठी तरतूद म्हणजे सर्व राज्यांमधील लोकसभेच्या जागा सरसकट ५० टक्क्यांनी वाढवणे. सध्याच्या ५४३ जागांवरून ही संख्या सुमारे ८१५ पर्यंत जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे, पुढील २५ वर्षे म्हणजेच २०५१ पर्यंत जागांच्या प्रमाणात बदल न करण्याचा किंवा मर्यादा कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय, मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्याशी हे विधेयक जोडण्यात आलं असून, ते २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू होणे अपेक्षित आहे. ३० नोव्हेंबरपासून लोकसभेचे आणि २ डिसेंबरपासून राज्यसभेचे विशेष अधिवेशन सुरू होत असून, तिथे हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

विधेयकाचे संभाव्य फायदे

पहिला मोठा फायदा म्हणजे लोकसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊन २०२९ च्या निवडणुकीपूर्वी महिलांचा सहभाग वाढू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सर्व राज्यांमध्ये ५० टक्के समान प्रमाणात जागा वाढवण्याची तरतूद आहे. लोकसभेच्या जागा वाढल्याने प्रत्येक खासदारावरील मतदारांचा भार विभागला जाऊन अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळू शकते.

विकासाच्या नावाखाली आणखी किती लूट होण्याची शक्यता

या निर्णयावर काही संभाव्य तोटे आणि राजकीय आक्षेपही घेतले जात आहेत. लोकसभेसह विधानसभांच्या जागा वाढल्यास खासदार आणि आमदारांचे पगार, भत्ते, निवासस्थान, सुरक्षा, प्रवास खर्च, कार्यालयीन व्यवस्था आणि पेन्शन यामुळे सरकारी तिजोरीवरील आणि करदात्यांवरील आर्थिक बोजा वाढेल, अशी टीका होत आहे. कारण आता आपण निवडणुका पाहत आहोत त्यात चक्क पैशाचा पाऊस पडत आहे,मग त्यात आणखी खासदार संख्या वाढल्यानंतर निवडणुकीत यात किती भर होईल याचा अंदाज लावणे कठीण आहे,याचा भार देशावर किती पडेल,विकासाच्या नावाखाली आणखी किती लूट होईल? दरम्यान या घटनादुरुस्तीसाठी दोन्ही सभागृहांत आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत जुळवणे हे मोठे आव्हान असणार आहे. आता येत्या संसदीय अधिवेशनात हे विधेयक मांडले गेल्यानंतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात आणि यावर काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    तिरुपती बालाजी चरणी चक्क १६० कोटींचे सोने दान! चेन्नईच्या भक्ताने दिले १२१ किलो सोन्याचे दागिने अन् मुकुट

    देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांची रोजच लाखोंच्या संख्येनं गर्दी असते. विशेष म्हणजे, रोजच दानपेटीत किंवा बालाजीचरणी देखील भाविकांकडून लाखो-करोडोंमध्ये दान करतात. सोनं-चांदी, हिरे,यांसह मौल्यवान वस्तूंची भेट तिरुपती…

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप; ९ फेब्रुवारीला थेट रिक्षाची चावी देणार

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या हाती आता थेट स्वयंरोजगाराची ‘चावी’ देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. पावसाचा लहरीपणा आणि शेतीतील अनिश्चिततेमुळे होणारा आर्थिक फटका कमी करण्यासाठी…

    Leave a Reply

    You Missed

    डिलिमिटेशन विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी! माञ विरोधकांचा आक्षेप, विकासाच्या नावाखाली लूट होण्याची शक्यता

    डिलिमिटेशन विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी! माञ विरोधकांचा आक्षेप, विकासाच्या नावाखाली लूट होण्याची शक्यता

    तिरुपती बालाजी चरणी चक्क १६० कोटींचे सोने दान! चेन्नईच्या भक्ताने दिले १२१ किलो सोन्याचे दागिने अन् मुकुट

    तिरुपती बालाजी चरणी चक्क १६० कोटींचे सोने दान! चेन्नईच्या भक्ताने दिले १२१ किलो सोन्याचे दागिने अन् मुकुट

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप; ९ फेब्रुवारीला थेट रिक्षाची चावी देणार

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप; ९ फेब्रुवारीला थेट रिक्षाची चावी देणार

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन