
देवनार पशुवधगृहातील व्यवस्थेचा कॉंग्रेस लोकप्रतिनिधींकडून आढावा
देवनार पशुवधगृहात सुविधांचा अभाव
मुंबई दि. ०२ जुन : येत्या शनिवारी येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने देवनार पशुवधगृहाच्या संपूर्ण व्यवस्थेचा आज आढावा घेतला.
यावेळी आमदार अस्लम शेख व खासदार वर्षाताई गायकवाड यांनी देवनार पशुवधगृहातील अव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पशुवधगृह व बकरा मंडईतील सुविधांसाठी येणारे २५ कोटी कोटी जातात कुठे..? असा प्रश्न उपस्थित करत सुविधांच्या नावाखाली फार मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप आमदार अस्लम शेख यांनी केला.
खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या, एवढी अव्यवस्था असताना देखील दरवर्षी त्याच कंत्राटदाराला काम दिले जाते. २५ कोटी खर्च करुन अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज असे केंद्र देखील सरकार बांधू शकले नाही.
मंडई परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. त्याच घाणीमध्ये बसून लोकांना जेवावं लागत आहे. पार्किंगची व्यवस्था नाही. शौचालयांची व्यवस्था नाही. या सर्व अनागोंदी कारभाराबाबत आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत, असं वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी आमदार अमीन पटेल, ज्योती गायकवाड हे देखील उपस्थित होते.