‘दुसरं आंदोलन, भय मुक्त भारत’,रुग्णालयातूनच सोनम वांगचुक यांचा पत्नीमार्फत देशवासीयांसाठी मोठा संदेश

सध्या देशात दिल्लीत जंतरमंतर मैदानात सुरु असलेलं सोनम वांगचुक यांचं उपोषणाचा मुद्दा जास्त चर्चेत असलेला दिसतोय. सोनम यांनी NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारांमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देऊन संविधानाच्या सहाव्या अनुसूचीचा समावेश करणे अशा अनेक मुद्द्यांसाठी आंदोलन सुरु केलं आहे.मात्र आज त्यांची तब्येत खालावल्यामुळे वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर मात्र आंदोलनस्थळी सर्वांचाच आक्रोश पाहायला मिळाला.

रुग्णालयातूनच सोनम वांगचुक यांचा महत्त्वाचा संदेश 

याची दुसरी बाजू देखील समोर येत असून सोनम वांगचुक यांना १८ जुलै रोजी जंतर मंतर येथे उपोषण करत असताना बळजबरीने उचलून रुग्णालयात नेण्यात आलं. जेणेकरून २० जुलै रोजीचा नियोजित संसदेवरील मोर्चा पुढे ढकलण्यात येणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, त्यांनी हा नियोजित मोर्चा काढण्याचं आवाहन केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हा मोर्चा म्हणजे भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ असेल असंही त्यांनी म्हटलंय. याबाबतचा संदेश त्यांनी त्यांच्या पत्नीमार्फत पाठवल्याची एक्स पोस्ट कॉकरोच जनता पार्टीने केली आहे.रुग्णालयातूनच सोनम वांगचुक यांनी त्यांच्या पत्नीमार्फत देशवासीयांसाठी दिलेला हा संदेश त्यांच्या पुढच्या वाटचालीचे चित्र दर्शवतो.

भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ

“२० जुलै, स्वातंत्र्यासाठी दुसरं आंदोलन, भय मुक्त भारत आणि अन्याय मुक्त भारत”, असा संदेश सोनम वांगचुक यांनी एका पेपरवर लिहिला आहे. पुढे असं लिहिलंय की, “पेपर लीकसारख्या अन्यायापासून स्वांतत्र्य आणि माझ्या बेयाकदेशीर अटकेच्या भीतापासून स्वातंत्र्य. भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ, संसदेवर मोर्चा. कृपया हे आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी करा.” असं म्हणत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवला आहे.

दरम्यान रुग्णालयाने सांगितलं की, वांगचुक यांच्या प्रदीर्घ उपोषणामुळे डिहायड्रेशनची (शरीरातील पाणी कमी होण्याची) लक्षणे दिसत आहेत, त्यामुळे तात्काळ वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे.त्यांच्या कुटुंबीयांनी अद्याप शिफारस केलेल्या वैद्यकीय उपचारांसाठी संमती दिलेली नाही. एम्सचे एक डॉक्टर उपचार करणाऱ्या पथकात सामील झाले आहेत आणि ते सतत देखरेख व क्लिनिकल व्यवस्थापनासाठी उपलब्ध राहतील.

खासगी रुग्णालयात उपचारांची मागणी

सोनम वांगचुक यांच्या पत्नीने सफदरगंज रुग्णालयातील उपचारांवर अविश्वास दाखवत उच्च न्यायालयात याचिका करून सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे. “सफदरजंग सरकारी रुग्णालयावरील माझा विश्वास उडाला आहे. रुग्णालयाने आम्हाला सांगितले की वांगचुक यांच्या पोटॅशियमची पातळी २.९ पर्यंत खाली आली आहे आणि ही बाब चिंताजनक व जीवघेणी असल्याचं म्हटलं आहे. तरीही, त्यांच्या सार्वजनिक आरोग्य बुलेटिनमध्ये, त्यांनी सोयीस्करपणे नेमका आकडा वगळला आणि केवळ “पोटॅशियमची पातळी कमी होत आहे” असा उल्लेख केला. एका स्वतंत्र प्रयोगशाळेच्या चाचणीत ही पातळी ३.५ आढळली, जी सामान्य मर्यादेतच आहे,” असं त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीची ही चळवळीला कोणती नवीन दिशा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 13वा दिवस आहे.दरम्यान जरांगेंनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा आंदोलक मनोज…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक