शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे यांनी चक्क एका भंगार व्यवसाय करणाऱ्याकडून खंडणी मागितल्याची तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली. नवी मुंबईच्या भंगार व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे.

शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या नेत्यानी भंगार व्यावसायिकाकडे खंडणी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार इंदिरा नगर परिसरात भंगाराचे दुकान चालवतात. दुकान सुरळीत चालवायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरोपींकडून करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र व्यापाऱ्याने पैसे देण्यास नकार दिला आहे. नकार दिल्यानंतर पूजा बनसोडे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह संबंधित दुकानात प्रवेश केला. यावेळी व्यापाऱ्याला तसेच दुकानातील कामगाराला मारहाण करण्यात आली. शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्की केल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

खंडणी, मारहाण आणि धमकीसह विविध कलमांखाली गुन्हा

घटनेनंतर पीडित व्यापाऱ्याने तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी खंडणी, मारहाण आणि धमकीसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला.त्यानंतर मुख्य आरोपी पूजा बनसोडे यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात रमजान शेख, सरिता सरवदे, नरेंद्र साकवार आणि हुसेन शेख यांचाही सहभाग असल्याचा आरोप असून हे चौघे सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून विविध ठिकाणी तपास सुरू आहे.

राजकीय पातळीवरही चर्चा

सत्ताधारी पक्षाशी संबंधित महिला पदाधिकाऱ्याला अशा गंभीर आरोपांमध्ये अटक झाल्याने या प्रकरणाची राजकीय पातळीवरही चर्चा सुरू झाली आहे. मात्र,पोलिसांनी हा तपास पुरावे आणि तक्रारीच्या आधारे सुरू असल्याचे स्पष्ट केले असून पुढील चौकशीनंतरच प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 13वा दिवस आहे.दरम्यान जरांगेंनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा आंदोलक मनोज…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक