राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षाला महाडमध्ये तरुण नेतृत्वाचे बळ; युवक अध्यक्षपदी महत्त्वाची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महाडतालुका युवक अध्यक्षपदी करण चव्हाण यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा एक भाग म्हणून प्रदेश पातळीवरून ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाद्वारे करण्यात आली आहे.

रायगड जिल्हा युवक अध्यक्ष समाधान म्हात्रे महाड दौऱ्यावर होते

सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी महाडच्या शासकीय विश्राम गृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष समाधान म्हात्रे महाड दौऱ्यावर आले होते. यावेळी महाड तालुका अध्यक्ष संदीप सपकाळ, रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे, माजी तालुकाध्यक्ष मुदस्सीरभाई पटेल, महाड शहराध्यक्ष पराग वडके,शहर उपाध्यक्ष कुर्बान खान, व्यापारी संघाचे अध्यक्ष सुमित अशोक वारे उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

महाड तालुका युवक अध्यक्षपदी करण रवींद्र चव्हाण यांची निवड

याप्रसंगीच अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाड तालुका युवक अध्यक्षपदी करण रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली. दिल्लीमध्ये चाललेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जविषयी जिल्हा युवक अध्यक्ष समाधान मात्रे यांनी निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबादेण्यासाठी महाडच्या तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आलं आहे.

करण रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याने पक्षाला कसा होणार फायदा?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महाड तालुका युवक अध्यक्षपदी करण चव्हाण यांची निवड झाल्यामुळे महाडमध्ये पक्षाला तरुण नेतृत्वाचे बळ मिळाले आहे. यामुळे पक्षाच्या स्थानिक धोरणांचे प्रभावीपणे डिजिटायझेशन होईल, स्थानिक युवकांचे प्रश्न जलदगतीने सुटतील, आणि महाडमधील वाढत्या बेरोजगारी, शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील समस्यांना थेट राजकीय व्यासपीठ मिळेल.

तसेच करण चव्हाण यांच्या माध्यमातून महाड आणि परिसरातील तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचणे पक्षासाठी सोपे होईल.पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अभियान अधिक गतिमान होईल. एवढंच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट होण्यास मदत मिळेल. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाणार? 15 ऑगस्टपर्यंत निर्णय द्या अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

BEST संयुक्त कामगार कृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत 15 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेतन कराराचा फेरविचार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या…

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस सुरु असून २१ जुलै ते २६ जुलैपर्यंत पावसाचा जोर जास्तच राहणार असल्याचा अंदाज…

Leave a Reply

You Missed

मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाणार? 15 ऑगस्टपर्यंत निर्णय द्या अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाणार? 15 ऑगस्टपर्यंत निर्णय द्या अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

25 दिवस उपोषणावर सोनम वांगचुक, सरकार गप्प का? जंतर-मंतर ते दिल्ली हिंसाचाराचा संपूर्ण लेखाजोखा

25 दिवस उपोषणावर सोनम वांगचुक, सरकार गप्प का? जंतर-मंतर ते दिल्ली हिंसाचाराचा संपूर्ण लेखाजोखा

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षाला महाडमध्ये तरुण नेतृत्वाचे बळ; युवक अध्यक्षपदी महत्त्वाची निवड

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षाला महाडमध्ये तरुण नेतृत्वाचे बळ; युवक अध्यक्षपदी महत्त्वाची निवड

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर ‘3 इडियट्स’ पुन्हा थिएटरमध्ये; रिलीज डेट काय माहितीये?

सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर ‘3 इडियट्स’ पुन्हा थिएटरमध्ये; रिलीज डेट काय माहितीये?

सडपातळ शरीर, डोळ्यांखाली सूज; सलमान खानची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, सलमाननेच दिलं उत्तर

सडपातळ शरीर, डोळ्यांखाली सूज; सलमान खानची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, सलमाननेच दिलं उत्तर

महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चिघळलं? आंदोलनाला रोखण्यासाठी लागू केलेले कलम १६३ नक्की आहे तरी काय?

कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चिघळलं? आंदोलनाला रोखण्यासाठी लागू केलेले कलम १६३ नक्की आहे तरी काय?

पावसामुळे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला फटका; दर्शनाबाबत भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय

पावसामुळे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला फटका; दर्शनाबाबत भाविकांसाठी महत्त्वाचा  निर्णय