मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाणार? 15 ऑगस्टपर्यंत निर्णय द्या अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

BEST संयुक्त कामगार कृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत 15 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेतन कराराचा फेरविचार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

बेमुदत आंदोलनाचाही इशारा

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा तसेच बेमुदत आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. यामागील कारण म्हणजे कृती समितीने 21 जून रोजी झालेल्या वेतन करारावर आक्षेप घेतला आहे.कर्मचाऱ्यांशी कोणतीही व्यापक चर्चा न करता हा करार करण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या आणि प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर वेतन कराराचा फेरविचार करून सर्व संबंधित संघटनांशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने 15 ऑगस्टपर्यंत प्रमुख मागण्यांबाबत  दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. वेतन कराराच्या फेरविचाराची प्रमुख मागणी बेस्ट कर्मचाऱ्यांनी केली आहे.समितीच्या देखील आणखी काही प्रमुख मागण्या आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

सुधारित वेतनश्रेणी लागू करावी.
महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सेवा-शर्ती लागू कराव्यात.
आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाला शासनाकडून आर्थिक मदत द्यावी.
प्रलंबित वेतन कराराची तातडीने अंमलबजावणी करावी.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘समान काम, समान दाम’ या तत्त्वानुसार वेतन द्यावे.

15 ऑगस्टनंतर बेमुदत संपाचा इशारा

समितीने स्पष्ट केले आहे की, 15 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर जातील. त्यामुळे मुंबईतील बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता राज्य सरकार आणि बेस्ट प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे कर्मचारी तसेच मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक