मुंबई, ठाणेसह या शहरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; थेट रेड अलर्ट जारी, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

सध्या महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. आज (२३ जुलै)ही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पु्ण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही शहरांसाठी थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला. नाशिक घाटमाथा, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टीही जाहीर केली. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस

तर मुंबईतही रात्रभर पाऊस मुसळधार पाऊस कोसळतोय. शिवाय अनेक भागात पावसाचे पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे.मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस कायम आहे.शिवाय आज २३ जुलै रोजी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.मुंबईसह ठाणे, कल्याण, डोबिंवली, बोरिवली, अंधेरी, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल, पालघर, भिवंडी या परिसरात रात्रभरपासून पावस सुरु असून पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. मुंबई, पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांता पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली. ज्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला.

मुंबईकरांचे पाणीकपातीचे संकट टळले 

दरम्यान या सततच्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी एक असलेल्या तानसा जलाशय भरून ओव्हरफ्लो झाले. विहार आणि तुळसी आता तानसा तलावही ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे मुंबईतील सातपैकी तीन तलाव पूर्ण भरले आहेत. सर्व जलाशयांमधील एकत्रित पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 62 टक्क्यांवर पोहोचला आहे. ज्यामुळे आता मुंबईकरांचे पाणीकपातीचे संकट टळले आहे.

पालघरमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती

पालघरमध्ये पावसाचा जोरदार पाऊस सुरू असून हडाणू ते विवर लोकलसेवा पूर्णपणे ठप्प आहे. यासोबतच आवश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळा, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय तसेच अंगणवाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली.तसेच आज डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधील जनजीवन विस्कळीत झाल्याच पाहायला मिळतंय. मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

सांगलीतही अतिवृष्टी

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा चांदोली खोऱ्यात व पाथरपुंज येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. वारणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज गुरुवारी 23 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत धरण 75.13 टक्के भरले असून एकूण पाणीसाठा 25.84 टीएमसी इतका झाला आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक