विद्यार्थी आंदोलनाबाबत ठाकरे बंधूंचा आक्रमक पवित्रा, थेट रस्त्यावर उतरणार; २६ जुलै रोजी मुंबईत ‘संयुक्त मोर्चा’

दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीच्या यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद फक्त दिल्लीतच नाही तर महाराष्ट्रातही पडताना दिसत आहे. महाराष्ट्रात देखील या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकीयमंडळींपर्यंत सर्वांचाच पाठिंबा मिळात आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेला लाठीमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या व्यक्त होणारा रोष पाहता आता ठाकरे बंधूंनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

ठाकरे बंधूंचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे थेट रस्त्यावर उतरणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले असून २६ जुलै रोजी मुंबईत भव्य संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांना दिलेल्या अयोग्य वागणुकीविरोधात आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संयुक्त मोर्चाची रणनीती आणि आराखडा स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे विशेष पत्रकार परिषद घेणार आहे.

२६ जुलै रोजी मुंबईत भव्य संयुक्त मोर्चा

दरम्यान याआधी मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. आता थेट देशातील तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याने २६ जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या या भव्य संयुक्त  मोर्चाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आदित्य ठाकरे आक्रमक

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तरुणांना आक्रमक होण्याचे आवाहन केले आहे. “तुमचं सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली. दिल्ली पोलिसांच्या लाठीमारावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबई पोलिसांमध्ये अजूनही संवेदनशीलपणा शिल्लक आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांसारखा विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला नाही.”

एवढंच नाही तर आदित्य ठाकरे यांनी तरुणांना आणि नागरिकांना २४ जुलै रोजी चार वाजता शिवाजी पार्क येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “कुठल्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नाही, तर केवळ भारताच्या तिरंग्याखाली एकत्र येऊन सामूहिक राष्ट्रगीत गाऊया आणि विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देऊया,” असे आवाहन त्यांनी केले.

अण्णा हजारेंचीही साथ

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या या लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून ते स्वतः मैदानात उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अण्णा हजारे आज गुरुवारी (२३ जुलै २०२६) ‘मौन आंदोलन’ करणार असून त्यांनी केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांशी तात्काळ संवाद साधण्याची मागणी केली आहे.अण्णा हजारे यांनी जाहीर केलेल्या आंदोलनानुसार, गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अहिल्यानगर येथील वाडिया पार्क परिसरातील महात्मा गांधी स्मारकासमोर ते मौन आंदोलनाला बसणार आहेत.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

मुंबई, ठाणेसह या शहरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; थेट रेड अलर्ट जारी, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

सध्या महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. आज (२३ जुलै)ही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पु्ण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही शहरांसाठी थेट…

मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाणार? 15 ऑगस्टपर्यंत निर्णय द्या अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

BEST संयुक्त कामगार कृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत 15 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेतन कराराचा फेरविचार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या…

Leave a Reply

You Missed

विद्यार्थी आंदोलनाबाबत ठाकरे बंधूंचा आक्रमक पवित्रा, थेट रस्त्यावर उतरणार; २६ जुलै रोजी मुंबईत ‘संयुक्त मोर्चा’

विद्यार्थी आंदोलनाबाबत ठाकरे बंधूंचा आक्रमक पवित्रा, थेट रस्त्यावर उतरणार; २६ जुलै रोजी मुंबईत ‘संयुक्त मोर्चा’

मुंबई, ठाणेसह या शहरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; थेट रेड अलर्ट जारी, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई, ठाणेसह या शहरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; थेट रेड अलर्ट जारी, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाणार? 15 ऑगस्टपर्यंत निर्णय द्या अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाणार? 15 ऑगस्टपर्यंत निर्णय द्या अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

25 दिवस उपोषणावर सोनम वांगचुक, सरकार गप्प का? जंतर-मंतर ते दिल्ली हिंसाचाराचा संपूर्ण लेखाजोखा

25 दिवस उपोषणावर सोनम वांगचुक, सरकार गप्प का? जंतर-मंतर ते दिल्ली हिंसाचाराचा संपूर्ण लेखाजोखा

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षाला महाडमध्ये तरुण नेतृत्वाचे बळ; युवक अध्यक्षपदी महत्त्वाची निवड

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षाला महाडमध्ये तरुण नेतृत्वाचे बळ; युवक अध्यक्षपदी महत्त्वाची निवड

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर ‘3 इडियट्स’ पुन्हा थिएटरमध्ये; रिलीज डेट काय माहितीये?

सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर ‘3 इडियट्स’ पुन्हा थिएटरमध्ये; रिलीज डेट काय माहितीये?

सडपातळ शरीर, डोळ्यांखाली सूज; सलमान खानची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, सलमाननेच दिलं उत्तर

सडपातळ शरीर, डोळ्यांखाली सूज; सलमान खानची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, सलमाननेच दिलं उत्तर

महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम