जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन तापलं, आता वकिलांचाही पाठिंबा, पण सर्वोच्च न्यायालयाची वकिलांना फटकार

NEET पेपर फुटीच्या कथित प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता एक नवीन वळण मिळालं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत, थेट सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी संविधानाची प्रस्तावना वाचून या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र,दुसरीकडे या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांनी वकिलांना चांगलेच सुनावले आहे.

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वकिलांचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर फुटीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अमानुष कारवाई आणि अश्रूधुराचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला जात.विद्यार्थ्यांवरील या कारवाईच्या निषेधार्थ सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी एकत्र येत संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यामध्ये आता ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी त्यांची भूमिका मांडून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

‘आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी येथे आलो आहोत’

त्या म्हणाल्या,” आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी येथे आलो आहोत. आम्ही न्यायाच्या बाजूने उभे आहोत आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, हीच आमची मागणी आहे. हे आंदोलन आमच्यासाठी नाही, तर विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आहे.विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सर्वोच्च न्यायालयासमोर उभे राहून न्यायाची मागणी करणे हे वकिलांचे कर्तव्य आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आणि जबाबदारी न्याय देण्याची आहे. म्हणूनच आम्ही या न्यायमंदिरात विद्यार्थ्यांच्या मागण्या घेऊन उपस्थित आहोत.” असं म्हणत त्यांनी वकिलांच्या कर्तव्याची जाणीव करून देत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे.

न्यायालयाची रोखठोक टिप्पणी अन् वकिलांनाच फटकार 

मात्र, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा प्रयत्न स्पष्टपणे फेटाळून लावला. एवढंच नाही तर एका वकिलाने जंतर-मंतरवरील पोलीस कारवाई आणि आंदोलनाचे व्हिडिओ खंडपीठासमोर मांडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आंदोलनाचे व्हिडिओ पाहण्यास नकार देत, कोर्टाचा वेळ वाया न घालवण्याचा सल्ला सरन्यायाधीशांनी संबंधित वकिलाला दिला. त्यामुळे एकीकडे रस्त्यावरून न्यायाची मागणी करणारे विद्यार्थी आणि त्यांना मिळालेला वकिलांचा पाठिंबा, तर दुसरीकडे न्यायाधीशांच्या खंडपीठाने घेतलेली विरोधातील भूमिका यामुळे आता NEET पेपर फुटीचा हा मुद्दा अधिकच पेटण्याची शक्यता आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक