महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस सुरु असून २१ जुलै ते २६ जुलैपर्यंत पावसाचा जोर जास्तच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या गुजरात किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राचा उत्तर भागात आणि विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्याची पावसाची परिस्थिती

सध्याची पावसाची परिस्थिती पाहता मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचे ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. संपूर्ण विदर्भात आज जोरदार पावसाची शक्‍यता असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत.दरम्यान पुढील पाच दिवस महाराष्ट्रात कसा पाऊस राहणार आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.

हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ ते २५ जुलै दरम्यान नैऋत्य मोसमी वारे गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रावर कायम राहणार आहेत.त्यामुळे कोकण, गोवा,मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार त्याला ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात ही पावसाचा जोर वाढणार असून पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत

राज्यात पुढील पाच दिवस कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

२१ जुलै रोजी मुंबई, पालघर, ठाणे,रायगड, पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचे ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

पालघर,नाशिक व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ,वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

मुंबईला कोणता अलर्ट जारी?

२२ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून नाशिक आणि पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून रत्नागिरी रायगड ठाणे, पालघर जिल्ह्यांसह नाशिक, सातारा,कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२३ जुलै रोजी तळ कोकणासह संपूर्ण कोकण किनारपट्टी तसेच मुंबई ठाणे पालघर नाशिक व कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस असल्याने तिथे यलो अलर्ट देण्यात आले आहेत.तर, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, जळगाव,अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे.

२४ जुलै रोजी ठाणे रायगड रत्नागिरी पुणे व सातारा घाटमाथा व गोंदिया जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर, २५ जुलै रोजी रायगड आणि पुणे घाटमाथ्यावर येलो अलर्ट देण्यात आला असून महाराष्ट्रभरातील पावसाचा जोर कमी होणार असल्याचं बोललं जात आहे.

कोकणात पावसाचा जोर वाढणार

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणातील किनारी भाग आणि लगतच्या घाट परिसरात पुढील २ ते ३ दिवस वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर कायम राहील. पुढील 24 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाट क्षेत्रात काही ठिकाणी विजांचा कडकडाटसह , सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यात हलका ते मध्यम, तर विदर्भात काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस हजेरीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी; कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी…

आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई पश्चिम उपनगरातील आरे मेट्रो स्टेशनखाली एका खाजगी बसला अचानक आग लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गोरेगाव पूर्वेला असलेल्या आरे मेट्रो स्थानकाखाली महादेव ट्रॅव्हल्स  कंपनीच्या स्लीपर कोच बसला ही आग…

Leave a Reply

You Missed

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी; कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी;  कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

“सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

“सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत