धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी कोण माहितीयेत?

जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाचे पडसाद देशभर पसरले होते. गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज (२५ जुलै २०२६)दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ज्यामुळे जंतर मंतर येथील सुरू असलेले आंदोलन संपुष्टात आले आहे.परीक्षा पद्धतीत सुधारणा, नीट पेपरफुटीसाठी जबाबदारी निश्चित करणे आणि केंद्रीय शिक्षणमात्र म्हणून प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीच्या नेतृत्वाखाली २० जून रोजी जंतर मंतर येथे हे विद्यार्थी आंदोलन सुरू झाले होते.

मंत्री प्रल्हाद जोशी सांभाळणार शिक्षण मंत्रालयाचा कारभार 

पण अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान मोदी यांना पाठवला आहे.प्रधान यांनी म्हटले आहे की, राष्ट्रसेवा करणे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च प्राधान्य आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. ते आता धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी शिक्षण मंत्रालयाचा कारभार सांभाळणार आहेत.

प्रल्हाद जोशींकडे ही अतिरिक्त जबाबदारी देखील 

पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे.अशा परिस्थितीत, आता शिक्षण मंत्रालयाचा कारभार कोण सांभाळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, केंद्र सरकारने ही अतिरिक्त जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे दिली आहे. प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाची देखील जबाबदारी आहे.

कोण आहेत प्रल्हाद जोशी ?

प्रल्हाद जोशी हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते सध्या एनडीए सरकारमध्ये ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी धारवाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विनोद आसुती यांचा 97,324 मतांनी पराभव करून सलग पाचव्यांदा विजय मिळवला.

दोन्ही पक्ष चार आठवड्यांनंतर पुन्हा भेटणार

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि सरकारने संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर, कॉकरोच जनता पार्टीने शनिवारी नीट वादावरून सुरू असलेले आपले ३६ दिवसांचे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा घडवून आणण्यासाठी दोन्ही पक्ष चार आठवड्यांनंतर पुन्हा भेटतील, असे सीजेपीने म्हटले आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत असणारी योजना आहे. स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिलांसाठी आता एक मोठं गिफ्ट सरकारकडून देण्यात येणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या…

Leave a Reply

You Missed

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार