पुणे महापालिका निवडणूक : बहुसदस्यीय प्रभाग रचनेवरून राजकीय वातावरण तापले; ठाकरे गट आणि काँग्रेसचा विरोध

मुंबईसारखाच एक सदस्यीय प्रभाग पुण्यातही असावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पुण्यात चार सदस्यीय प्रभाग रचना लागू करण्याच्या निर्णयावर ठाकरे गट आणि काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवला आहे. जर राज्य सरकारने चार सदस्यीय प्रभाग रचना लागू केली, तर आम्ही कोर्टात जाण्याचा मार्ग स्वीकारू, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिला आहे.

संजय मोरे म्हणाले की, “चार सदस्यीय प्रभागांमुळे नगरसेवकांना काम करणे अवघड होते. एक सदस्यीय प्रभाग असावा म्हणजे मतदारसंघाशी जवळीक वाढते आणि जबाबदारी निश्चित होते. सत्ता भोगण्याचा भाजपचा उद्देश असून, सामान्य जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काही देणं-घेणं नाही.”

काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीही यास तीव्र शब्दांत विरोध नोंदवला. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा रडीचा डाव खेळत असून, चार सदस्यीय प्रभाग रचना करून ते सत्ता हस्तगत करण्याचा डाव आखत आहेत. आम्ही याला कटाक्षाने विरोध करू.”

राज्यात महापालिका निवडणुकीसंदर्भात नवा प्रभागरचना आराखडा तयार करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत यापूर्वीप्रमाणेच 227 एक सदस्यीय प्रभाग राहणार असले तरी, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली अशा महापालिकांमध्ये तीन ते चार सदस्यीय प्रभाग रचना लागू होणार आहे. पुण्यात यंदा 162 नगरसेवक निवडून येणार असून, त्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे.

प्रभाग रचना वर्गवारी :
• अ वर्ग: पुणे, नागपूर
• ब वर्ग: ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
• क वर्ग: नवी मुंबई, वसई-विरार, छ. संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली
• ड वर्ग: अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, भिवंडी, नांदेड, धुळे आदी

ड वर्गातील महापालिकांमध्ये शक्यतो चार सदस्यीय प्रभाग असणार आहेत. परंतु काही ठिकाणी तीन किंवा पाच सदस्यीय प्रभाग असण्याचीही शक्यता आहे.

पुणेकरांचा प्रश्न कायम – “दाद कुणाकडे मागायची?”

गेल्या काही वर्षांपासून प्रशासकांच्या अधिपत्याखाली असलेल्या पुणे महापालिकेत नागरिकांचे मूलभूत प्रश्न प्रलंबितच आहेत. प्रभागांचा प्रतिनिधी नसल्याने नागरिकांच्या समस्या न मांडल्या जात असल्याचं चित्र आहे. अधिकारी वर्ग आणि ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे सामान्य पुणेकरांचे हाल वाढले आहेत. त्यामुळे “दाद मागायची तरी कुणाकडे?” असा प्रश्न पुणेकरांमध्ये उपस्थित झाला आहे.

पुणेकरांचा रोष आणि राजकीय पक्षांचा विरोध लक्षात घेता, बहुसदस्यीय प्रभाग रचना लागू करण्यासंदर्भातील निर्णय पुढील काळात अधिक वादग्रस्त ठरण्याची चिन्हं आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार, नव्या पिढीच्या संघर्षाची अन् सामाजिक परिवर्तनाची दिशा,सांस्कृतिक वारसा अन् नव्या पिढीची जबाबदारी

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक, कादंबरीकार किंवा शाहीर नव्हते; ते भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक सांस्कृतिक योद्धे होते. मातंग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊंनी दारिद्र्य, स्थलांतर, उपेक्षा आणि अन्याय जवळून…

    विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजू नका; आधी त्यांच्या न्यायासाठी उभे राहा!

    दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाने गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक राजकीय पक्ष किती गंभीर आहे, हे देशातील विद्यार्थी आणि मतदारांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा…

    Leave a Reply

    You Missed

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

    ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

    ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका