पालघरला रेड अलर्ट; मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा, लोकल वाहतुकीवर परिणाम

palghar-red-alert-mumbai-heavy-rain-live-updates मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतूक मंदावली असून, नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हवामान विभागाने मुंबईला पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांसाठी महत्त्वाचे ठरणार असून, जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पावसाचा परिणाम लोकल वाहतुकीवरही दिसू लागला आहे. काही मार्गांवर लोकल वाहतूक उशिराने सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

दक्षिण मुंबईवर काळ्या ढगांचे सावट पाहायला मिळत असून समुद्रकिनारी उंच लाटा उसळताना दिसत आहेत. संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत झाकला गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे समुद्रकिनारी जाणे टाळावे, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

या गॅसच्या संपर्कात आल्याने 40 हून अधिक नागरिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला असून, 15 पेक्षा अधिक जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूरमधील गोधनी…

अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशू अतिदक्षता विभागात म्हणजे SNCUमध्ये अचानक आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा…

Leave a Reply

You Missed

नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

जिद्द, कष्ट आणि यश! पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राचा डंका,पटेल वाडीतील गायत्रीने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण

जिद्द, कष्ट आणि यश! पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राचा डंका,पटेल वाडीतील गायत्रीने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण

माणगावातील धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी

माणगावातील धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी

छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना

छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवक पदावर टांगती तलवार

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवक पदावर टांगती तलवार

मुंबईकरांच्या खिशाला कात्री; 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ, मुंबई, ठाणेसह कुठे होणार भाडेवाढ?

मुंबईकरांच्या खिशाला कात्री; 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ, मुंबई, ठाणेसह कुठे होणार भाडेवाढ?

मुंबईत मध्यरात्री भीषण दुर्घटना! कुर्ल्यात क्रेन कोसळून ८ ते १० जण जखमी, दोन घरांवर कोसळला ढिगारा

मुंबईत मध्यरात्री भीषण दुर्घटना! कुर्ल्यात क्रेन कोसळून ८ ते १० जण जखमी, दोन घरांवर कोसळला ढिगारा