अखेर ‘त्या’ व्हिडीओची दखल; महिला आंदोलकाला कानशि‍लात मारणं महागात; पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्यावरून थेट उचलबांगडी

नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने एका महिला आंदोलकाच्या कानशि‍लात लगावली होती. तो व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. या घटनेची दखल घेण्यात आली असून त्या पोलीस अधिकाऱ्याला कर्तव्यावरून हटवण्यात आले आहे. अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांना सुरक्षेच्या आणि जंतर-मंतरवरील कर्तव्यावरून हटवण्यात आले आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. हायकोर्टाच्या फटकारानंतर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्याबाबत कारवाई

दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपर लीकविरोधात आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनादरम्यान एका महिला आंदोलकाच्या कानशि‍लात मारणारे दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त संदीप लांबा यांची जंतर-मंतर आंदोलन स्थळाच्या बंदोबस्तावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे.

युनिफॉर्ममधील अशा गुंडांची नावे घेण्यास आपण घाबरता कामा नये

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने उपस्थित राहिलेले ज्येष्ठ वकील गोपाळ शंकरनारायणन यांनी न्यायालयात व्हिडिओचा दाखला देत म्हटलं “अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा काहीही न करणाऱ्या आणि शांत उभ्या असलेल्या एका महिलेला थप्पड मारताना दिसत आहेत. युनिफॉर्ममधील अशा गुंडांची नावे घेण्यास आपण घाबरता कामा नये. त्यांना न्यायालयात बोलावून या घटनेबाबत त्यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आली.दरम्यान गर्दी पांगवण्यासाठी प्रथमतः वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा फवाऱ्यांचा वापर न करता थेट अश्रूधुराच्या नळकांड्या आंदोलकांच्या दिशेने फेकण्यात आल्याचा आरोपही न्यायालयात करण्यात आला.

पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल

तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार साकेत गोखले यांनी आज गुरुवारी संदीप लांबा यांच्याविरोधात पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. “काल दिल्ली उच्च न्यायालयात सरकारने उत्तर दिले की पोलिसांच्या मारहाणीप्रकरणी कोणीही तक्रार दिलेली नाही. त्यामुळे आज मी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन संदीप लांबा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे,” असं म्हणत त्यांनी भूमिका मांडली तसेच त्यांनी ‘X’ वर याबबात पोस्टही शेअर केली आहे.

न्यायालयाची केंद्र आणि पोलिसांना नोटीस

उच्च न्यायालयाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत दिल्ली पोलीस, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला नोटीस बजावली असून 4 आठवड्यांत उत्तर मागितले आहे. तसेच, या आंदोलनाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिऑग्राफी सुरक्षित जतन करण्याचे आदेश दिले आहेत.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक