अभिजीत दिपके लवकरच लग्नबंधनात अडकणार? आईचा मोठा खुलासा, म्हणाल्या दोन वर्षांपासून त्याचे …

कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील मोठ्या आंदोलनामुळे देशभरात काय पडसाद उमटले हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नक्कीच नाही. CJP च्या कार्यकर्त्यांनी अखेर या आंदोलनाला मोठे यश मिळवून दाखवलं. शेवटपर्यंत कॉकरोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधान याच्या राजीनाम्यावर ठाम राहिली. अखेर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

दरम्यान जंतर मंतरवरील आंदोलनानंतर अभिजीत दिपके अखेर त्याच्या घरी पोहोचला आहे. यावेळी त्याचे छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. मात्र आता अभिजीत दिपकेबद्दल आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय ती म्हणजे तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची.

आईचे लग्नाबद्दल मोठे विधान 
अभिजीत दिपकेच्या आईने नुकताच त्याच्या लग्नाबद्दल मोठे विधान केलं आहे.अभिजीत दिपके याच्या कुटुंबियांनी त्याच्या लग्नाबद्दल बोलताना म्हटले की,”अभिजीतसाठी जास्त प्रमाणात लग्नासाठी स्थळे येत आहेत. पण त्याचे म्हणणे आहे की, जोपर्यंत तो पूर्णपणे आर्थिक सक्षम होणार नाही, तोपर्यंत तो लग्न करणार नाही.”

मागील दोन वर्षांपासून त्याला लग्नासाठी स्थळं येत आहेत

एवढच नाही तर अभिजीतच्या आईने म्हटलं आहे की,अभिजीतला मागील दोन वर्षांपासून त्याचे लग्न ठरवण्यासाठी आम्हीही त्याला समजावत आहोत. त्याला लग्नासाठी दोन वर्षांपासूनच स्थळे येत आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून अधिक स्थळ येऊ लागली आहेत. पण या लग्नाच्या प्रस्तावावर अभिजीतने म्हटलं आहे की,”माझे शिक्षण पूर्ण होऊ द्या आणि मला चांगल्याप्रकारे आर्थिक सक्षम होऊ द्या, त्यानंतर मी लग्न करेल.” तो त्याच्या या निर्णयावर ठाम असल्याचं त्याने सांगितलं. अभिजीतच्या आई पुढे म्हणाल्या “त्याला मी कायम हे म्हणत आले की आपल्याकडे व्यवस्थित पैसा पाणी आहे. पण त्याने नेहमीच म्हटले की, मला स्वत: पैसा कमवायचा आहे.”

CJP ची देशभरात एक वेगळीच क्रेझ 

जून 2026 मध्ये अभिजीत दिपके अमेरिकेच्या बॉस्टन येथून दिल्ली येथे पोहोचला. नीट परीक्षेच्या विरोधात त्याने मोर्चा उभा केला.त्यानंतर हीच चळवळ पुढे कायम ठेवून जंतर मंतरवर आंदोलन सुरु केलं.या आंदोलनाने देशभर धुमाकूळ घातला. देशभरातून विद्यार्थी रस्त्यावर उतरले. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची गर्दी वाढत गेली. सरकारला अखेर या आंदोलकांपुढे झुकावे लागले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.त्यामुळे आता CJP ची देशभरात एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    रेस्टॉरंट्स, हॉटेलनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना आपला मोर्चा आता रुग्णालयांकडे वळवला आहे. रुग्णालयातील रुग्णांना औषधांच्या नावाखाली हजारो पटीने अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार…

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले असून, महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी ९० दिवसांचा अल्टीमेटम दिला आह. जरांगे पाटील यांनी…

    Leave a Reply

    You Missed

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी