गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी कोकणात जाण्याची तयारी करत आहेत. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाकडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे.एसटी महामंडळाने हजारोंच्या घरात जादा बसगाड्या सोडण्याची घोषणा केली आहे.गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने तब्बल ५,२२० जादा बसगाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. ७ ऑगस्ट रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाने मोठा दिलासा दिला आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ तब्बल 5220 जादा बसगाड्या सोडणार असल्याने कोकणवासीय मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाता येणार आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर विभागांतील प्रमुख बसस्थानकांवरून या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.

विशेष जादा गाड्या कधीपासून?

यंदा गणेशोत्सवात गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने ७ सप्टेंबरपासून जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. या गाड्यांचा कालावधी २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना सरनाईक यांनी सांगितले की, नफा-तोटा न पाहता प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देण्यास महामंडळ कटिबद्ध आहे. कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवाला विशेष भावनिक महत्त्व असून, गणपती बाप्पा, कोकणवासीय आणि एसटी यांच्यातील नाते घट्ट असल्याचेही त्यांनी नमूद केलं.

आरक्षण आणि ग्रुप बुकिंगची सुविधा कशी असणार?

जादा बसगाड्यांचे आरक्षण एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसेच एसटी बस रिझर्वेशन मोबाईल ॲपद्वारे करता येईल. तसेच प्रवाशांना बसस्थानकांवर जाऊन देखील तिकीट बुक करता येणार आहे.

किमान ४० प्रवाशांचा ग्रुप असल्यास १० ऑगस्टपासून ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेअंतर्गत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे, तर अमृत योजनेअंतर्गत नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडे सवलत मिळणार आहे.

प्रवासादरम्यान अतिरिक्त सुविधा

गणेशोत्सव काळात प्रवास सुरळीत व्हावा यासाठी प्रमुख बसस्थानके आणि थांब्यांवर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी चोवीस तास तैनात राहणार आहेत. तसेच कोकणातील प्रमुख महामार्गांवर वाहन दुरुस्ती पथकेही सज्ज ठेवली जाणार आहेत, जेणेकरून प्रवाशांना तातडीने मदत मिळू शकेल आणि प्रवास विनाअडथळा पार पडेल. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीचा होणार हे नक्की.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    उत्सव, धार्मिक कार्यक्रम साजरे करताना मात्र त्यासाठी ध्वनी, वायुप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने…

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    ‘सैराट’ चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी ‘आर्ची’ म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. पण तिचं विषेश आकर्षण ठरलं ते म्हणजे तिच्या साध्यापणाचं. रिंकू राजगुरू ही नक्कीच घराघरात…

    Leave a Reply

    You Missed

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार