प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

भारताच्या डीप-टेक क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या एका मोठ्या निधीवाटपावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. पहिल्या टप्प्यात २२ खाजगी कंपन्यांना २,१९२ कोटी रुपयांची सवलतीचे कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. मात्र,’द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या अहवालानुसार एका तपासणीतून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

१२४ अर्जदारांमधून २२ कंपन्यांची निवड अन् २,१९२ कोटी रुपयांची सवलतीचे कर्ज

मंजूर करण्यात आलेल्या २,१९२ कोटी रुपयांपैकी तब्बल ६२ टक्के रक्कम म्हणजेच १,३७७ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी अशा कंपन्यांना मिळाला आहे, ज्यांचा थेट संबंध निवड समितीच्या सदस्यांशी असल्याचं म्हटलं जातं. एकूण १२४ अर्जदारांमधून २२ कंपन्यांची निवड करण्यात आली. यासाठी १२ सदस्यांचे पॅनेल तयार करण्यात आले होते, ज्यामध्ये खाजगी क्षेत्रातील ११ तज्ज्ञ आणि १ सरकारी प्रतिनिधी होता. तपासणीनुसार, निवड झालेल्या २२ पैकी १५ कंपन्यांचे थेट संबंध या निवड समितीतील ७ सदस्यांशी आहेत.

या कंपन्यांना एकूण १,३७७ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी

म्हणजे या कंपन्यांना एकूण १,३७७ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. यापैकी नऊ कंपन्या निवड समितीच्या अध्यक्षांशी संबंधित आहेत, जे एका एंजल इन्व्हेस्टिंग नेटवर्कचे संस्थापक आहेत आणि निवडलेल्या कंपन्यांपैकी किमान एका कंपनीत त्यांची हिस्सेदारी देखील आहे.हे सदस्य तंत्रज्ञान विकास मंडळाच्या गुंतवणूक समितीचे भाग आहेत, जे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या दोन संस्थांपैकी एक आहे, ज्यांच्यावर नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ₹१ लाख कोटींच्या संशोधन, विकासासाठी निधी देण्यासाठी कंपन्यांची निवड करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या कंपन्यांशी संपर्क साधला असता, पॅनेलच्या सर्व सात सदस्यांनी कोणताही गैरप्रकार केल्याचे आरोप फेटाळले आहेत.

संसदेतही उचलला गेला मुद्दा

दरम्यान हा मुद्दा नुकताच संसदेतही उचलला गेला. काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रवीण चक्रवर्ती यांनी यावर प्रश्न उपस्थित केले. यावर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत उत्तर देताना, निधीसाठी निवडलेल्या कंपन्यांमध्ये आर्थिक हितसंबंध जाहीर केलेल्या सात सदस्यांची नावे मान्य केली.

खासदार प्रवीण चक्रवर्ती यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना म्हटलं की, “डीप-टेक मधील संशोधन आणि विकासासाठी निधी देणाऱ्या समितीत प्रामुख्याने शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि नफा न कमावणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असावा. व्यावसायिक मूल्यांकन बाहेरूनही करून घेता आले असते.”

आरोपांवर सरकारचे स्पष्टीकरण

तर दुसरीकडे या आरोपांवर समितीचे सदस्य आणि सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. निवड समितीच्या सर्व सात सदस्यांनी कसलाही गैरप्रकार झाल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. त्यांच्या मते त्यांनी आपल्या गुंतवणुकीची माहिती सरकारला आधीच दिली होती.तसेच नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या कंपन्यांशी त्यांचा संबंध होता, त्या कंपन्यांच्या मूल्यांकन प्रक्रियेतून ते स्वतः दूर राहिले होते.एवढंच नाही तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानेही स्पष्ट केले आहे की, ही सर्व निवड केवळ “गुणवत्तेच्या आधारावर” झाली आहे आणि हितसंबंध असलेल्या कोणत्याही सदस्याचा संबंधित प्रस्तावांच्या मंजुरी प्रक्रियेशी कोणताही संबंध नाही.

निवड समितीच्या सर्व सात सदस्यांनी कसलाही गैरप्रकार झाल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असले आणि नियमांचे पालन केल्याचे सरकार सांगत असले, तरी १ लाख कोटी रुपयांच्या या निधीच्या पारदर्शकतेवर आणि नैतिकतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाचा स्फोट! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी, कडेकोट बंदोबस्तात ज्ञानेश कुमार निवासस्थानातून कार्यालयाकडे रवाना

    २३ सप्टेंबर २०२६ रोजी सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झालेल्या PTI च्या व्हिडिओ फुटेजमध्ये, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे कडेकोट सुरक्षेत नवी दिल्लीतील आपल्या शासकीय निवासस्थानातून बाहेर पडून…

    “धूर निघत असतानाही ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं”, धावत्या AC स्लीपर बसने घेतला पेट; ९ प्रवासी जिवंत जळाले

    NCR ला लागून असलेल्या ग्रेटर नोएडाच्या यमुना एक्सप्रेसवेवर एक दुर्देवी घटना घडली आहे. नोएडा येथून महोबाला चाललेल्या एका खासगी डबल डेकर स्लीपर AC बसने अचानक पेट घेतला. या भयानक दुर्घटनेत…

    Leave a Reply

    You Missed

    निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाचा स्फोट! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी, कडेकोट बंदोबस्तात ज्ञानेश कुमार निवासस्थानातून कार्यालयाकडे रवाना

    निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाचा स्फोट! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी, कडेकोट बंदोबस्तात ज्ञानेश कुमार निवासस्थानातून कार्यालयाकडे रवाना

    ‘मुंबईच्या राजा’चं यंदा ऐतिहासिक विसर्जन! गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार विसर्जनाबाबत ‘हा’ प्रयोग

    ‘मुंबईच्या राजा’चं यंदा ऐतिहासिक विसर्जन! गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार विसर्जनाबाबत ‘हा’ प्रयोग

    “धूर निघत असतानाही ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं”, धावत्या AC स्लीपर बसने घेतला पेट; ९ प्रवासी जिवंत जळाले

    “धूर निघत असतानाही ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं”, धावत्या AC स्लीपर बसने घेतला पेट; ९ प्रवासी जिवंत जळाले

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन