NCR ला लागून असलेल्या ग्रेटर नोएडाच्या यमुना एक्सप्रेसवेवर एक दुर्देवी घटना घडली आहे. नोएडा येथून महोबाला चाललेल्या एका खासगी डबल डेकर स्लीपर AC बसने अचानक पेट घेतला. या भयानक दुर्घटनेत 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रवासी जिवंत जळाले तर काहींचा श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाला.
AC बसने अचानक पेट घेतला, काही प्रवासी जिवंत जळाले
राज कल्पना ट्रॅवल्सची स्लीपर बस दिल्लीहून महोबाच्या दिशेने जात होती. बसमध्ये साधारण ४० ते ५० प्रवासी होते. प्रवासी गाढ झोपेत असताना, बुधवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. ही बस ग्रेटर नोएडा येथून बस आग्र्याच्या दिशेने जात असताना यमुना एक्सप्रेस वे वरील दयानतपुर गावाजवळ ही दुर्घटना घडली. ही प्रायवेट डबल डेकर बस दयानतपूर गावाजवळ पोहोचताच अचानक बसमधून धूर येऊ लागला. बसला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. चालकाने प्रसंगावधान दाखवत लगेच बस एक्सप्रेस वेच्या कडेला उभी केली. लगेच संपूर्ण बसने पेट घेतला. पाहता-पाहता बस आगीचा गोळा बनली. आतमधल्या प्रवाशांना काही समजण्याआधीच संपूर्ण बसला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. बसच्या आतून ओरडण्याचे, किंचाळण्याचे आवाज येत होते.
बचावलेल्या प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितलेला अनुभव
या दुर्घटनेतून बचावलेल्या महिलेनं सांगितलं की, “झोपेत असतानाच कोणीतरी दरवाजा जोरात वाजवून बसला आग लागल्याचे सांगितले. बसच्या इंजिनच्या बाजूला आणि ड्रायव्हरच्या केबिनमधून अचानक काहीतरी जळण्याचा वास येऊ लागला आणि धूर येत होता. आरडाओरडा, पळापळ सुरु होती. मी माझं सामान, बूट काही उचललं नाही. फक्त फोन हातात घेतला आणि बाहेरच्या बाजूला सगळे पळालो. बसमध्ये इतका धूर होता की, आतमध्ये काही दिसत नव्हतं. श्वास कोंडला गेल्यामुळे लोक आत तडफडत होते. मागे काही लोक अडकलेले ते बाहेर निघू शकले नाहीत. जीव वाचवण्यासाठी लोक एकमेकांना धक्के देत बाहेर पडत होते.”
Tragic fire on Yamuna Expressway near Greater Noida.
A private sleeper bus traveling from Noida to Mahoba caught fire overnight. Around 35 passengers were on board. Most were asleep.
Nine people burned to death. Others jumped from windows through thick smoke. The bus was completely gutted.
Fire reportedly started near the driver’s area. Cause still under investigation.
UP CM Yogi Adityanath has offered condolences and directed medical aid for the injured and support for families.
These incidents keep repeating on Indian highways. Sleepers, AC wiring, emergency exits, fire extinguishers — standards exist on paper. Enforcement is the gap.
Rest in peace to those who didn’t make it out.— pardeep jakhar (@jakharpardeep) September 24, 2026
चालकाने दुर्लक्ष केलं
तसंच काही या दुर्घटनेत बचावलेल्या काही प्रवाशांनी हे देखील सांगितलं की चालकाला बसच्या इंजिनच्या बाजूला आणि ड्रायव्हरच्या केबिनमधून अचानक काहीतरी जळण्याचा वास येऊ लागला आणि धूर येत असल्याची याची माहितीही दिली होती, मात्र चालकाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
आगीचं कारण काय?
दुर्घटनेची माहिती मिळताच यमुना एक्सप्रेस वे चे खासगी सुरक्षारक्षक, फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि बचाव पथकाने अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवलं. होरपळलेल्या प्रवाशांना लगेच नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. प्रारंभिक चौकशीत शॉर्ट सर्किटला आगीचं कारण मानलं जातय. पोलीस अपघाताची सखोल चौकशी करत आहे.
योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेची माहिती घेतली. सीएम योगींनी जिवीतहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. ज्यांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलय त्यांच्या कुटुंबियांबद्दल दु:ख व्यक्त केलं. सीएम योगींनी अपघातातील जखमींना चांगल्यात चांगले उपचार देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.










