लायसन्स हवे असेल तर ‘मराठी’ यायलाच हवं! कॅब किंवा ऑटो चालकांसाठी शासनाचा मोठा निर्णय;परिवहन मंत्र्यांची माहिती

कॅब किंवा ऑटो चालवणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे अन्यथा लायसन्स रद्द होऊ शकत. याचं कारण म्हणजे प्रवाशांसोबत मराठीत बोलणे. प्रवाशांसोबत आता मराठीत बोलले नाही तर चालकाचे लायसन्स होईल रद्द होण्याची शक्यता आहे.कारण मराठीचे व्यवहारिक ज्ञान नसलेल्या चालकांवर परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज जाहीर होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मराठी भाषा येणे बंधनकारक

महाराष्ट्रात आता टॅक्सी, रिक्षा असो वा ओला, उबरसारख्या अ‍ॅप-आधारित कॅब्स, चालकांना व्यावहारिक मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले आहे. मराठी भाषा न येणाऱ्या चालकांचा परवाना थेट निलंबित केला जाईल किंवा रद्द करण्याची कठोर कारवाई केली जाणार आहे. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी १२ ऑगस्ट २०२६ रोजी ही माहिती दिली.

वाहन चालवण्याच्या अधिकृततेसाठी अर्ज करताना मराठीचे व्यवहारिक ज्ञान आवश्यक

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा करून ‘antecedents’ या शब्दांनंतर “and working knowledge of Marathi language” हे शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालवण्याच्या अधिकृततेसाठी अर्ज करताना मराठीचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.

नियमांचे पालन न केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द

नव्या नियमानुसार, एखाद्या चालकाला मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळल्यास प्रथम त्याला एक महिन्याची मुदत देण्यात येईल. या काळात मराठी शिकण्यात सुधारणा न झाल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मराठीची अट यापूर्वीही नियमांमध्ये होती.

मंत्री सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, व्यावसायिक वाहन चालकांसाठी मराठीची अट यापूर्वीही नियमांमध्ये होती. मात्र तिची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नव्हती. प्रवाशांशी सहज आणि प्रभावी संवाद साधता यावा,विशेषतः स्थानिक प्रवाशांना सेवा देताना भाषेचा अडथळा येऊ नये, यासाठी ही अट महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिवहन विभागाने याबाबतचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवला होता. मंजुरी मिळाल्यानंतर आता या निर्णयाला कायदेशीर स्वरूप मिळणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    घाटकोपर दरड दुर्घटना अपडेट! ढिगाऱ्याखालून आणखी मृतदेह बाहेर; मृतांचा आकडा वाढला, बचावकार्य सुरुच

    मुंबईतील घाटकोपरच्या अशोकनगर परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवारी ११ ऑगस्ट रोजी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी साकीनाका गौसिया चाळ परिसरात डोंगराचा काही भाग अचानक कोसळला. ही दरड…

    VIDEO!मुंबईतील विलेपार्लेत अग्नितांडव; उच्चभ्रू इमारतीला भीषण आग, अडीच वर्षांच्या चिमुरड्यासह एका महिलेचा मृत्यू

    मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथील एका निवासी इमारतीच्या ११व्या मजल्यावर मंगळवारी दि.११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोन जणांचा…

    Leave a Reply

    You Missed

    घाटकोपर दरड दुर्घटना अपडेट! ढिगाऱ्याखालून आणखी मृतदेह बाहेर; मृतांचा आकडा वाढला, बचावकार्य सुरुच

    घाटकोपर दरड दुर्घटना अपडेट! ढिगाऱ्याखालून आणखी मृतदेह बाहेर; मृतांचा आकडा वाढला, बचावकार्य सुरुच

    लायसन्स हवे असेल तर ‘मराठी’ यायलाच हवं! कॅब किंवा ऑटो चालकांसाठी शासनाचा मोठा निर्णय;परिवहन मंत्र्यांची माहिती

    लायसन्स हवे असेल तर ‘मराठी’ यायलाच हवं! कॅब किंवा ऑटो चालकांसाठी शासनाचा मोठा निर्णय;परिवहन मंत्र्यांची माहिती

    VIDEO!मुंबईतील विलेपार्लेत अग्नितांडव; उच्चभ्रू इमारतीला भीषण आग, अडीच वर्षांच्या चिमुरड्यासह एका महिलेचा मृत्यू

    VIDEO!मुंबईतील विलेपार्लेत अग्नितांडव; उच्चभ्रू इमारतीला भीषण आग, अडीच वर्षांच्या चिमुरड्यासह एका महिलेचा मृत्यू

    खड्डे अन् वाहतूक कोंडीला वैतागून चाकणमधील २० कंपन्यांना टाळे? ४,००० कामगारांच्या नोकरीचा प्रश्न

    खड्डे अन् वाहतूक कोंडीला वैतागून चाकणमधील २० कंपन्यांना टाळे? ४,००० कामगारांच्या नोकरीचा प्रश्न

    कर्जतनंतर आता नाशिकच्या चिमुकल्यांची कमाल! पाण्याच्या बॉटलचा माईक अन् रस्त्याच्या खड्ड्यांचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’, व्हिडिओ व्हायरल

    कर्जतनंतर आता नाशिकच्या चिमुकल्यांची कमाल! पाण्याच्या बॉटलचा माईक अन् रस्त्याच्या खड्ड्यांचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’, व्हिडिओ व्हायरल

    मुंबई-पुणे प्रवास करणार आहात? मग आधी ही बातमी वाचा, 12 ऑगस्टला मिसिंग लिंक बंद; काय आहे कारण ?

    मुंबई-पुणे प्रवास करणार आहात? मग आधी ही बातमी वाचा, 12 ऑगस्टला मिसिंग लिंक बंद; काय आहे कारण ?

    छत्रीचा माईक अन् व्हायरल व्हिडिओचा इम्पॅक्ट! कर्जतच्या शाळकरी मुलींच्या ‘ग्राऊंड रिपोर्ट’मुळे काही तासांत रस्ता दुरूस्त, खड्डे बुजवले; नेटकऱ्यांकडून कौतुक

    छत्रीचा माईक अन् व्हायरल व्हिडिओचा इम्पॅक्ट! कर्जतच्या शाळकरी मुलींच्या ‘ग्राऊंड रिपोर्ट’मुळे काही तासांत रस्ता दुरूस्त, खड्डे बुजवले; नेटकऱ्यांकडून कौतुक

    महिलांना प्रशासकीय मार्गदर्शन अन् सायबर सुरक्षेचे धडे! श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे ‘दिशा महिला प्रभाग संघा’च्या वार्षिक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

    महिलांना प्रशासकीय मार्गदर्शन अन् सायबर सुरक्षेचे धडे! श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे ‘दिशा महिला प्रभाग संघा’च्या वार्षिक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

    झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनापासून ढाब्यावरच्या त्या सोळा वर्षांच्या मुलापर्यंतचा प्रश्न…

    झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनापासून ढाब्यावरच्या त्या सोळा वर्षांच्या मुलापर्यंतचा प्रश्न…