नाशिककरांचे हाल! सिटी लिंक बससेवा कोलमडली; तब्बल २०० फेऱ्या रद्द, महापौरांनी स्पष्ट केलं कारण

नाशिककरांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. नाशिक शहरातील सिटी लिंक बससेवा सध्या कोलमडली आहे. नाशिक प्रशासनाने तब्बल 200 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत . शहरातील 200 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याने सर्वसामान्यांसह प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार आहेत. शहरात वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण प्रशासनाने निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

वाहतूक कोंडीमुळे २०० बस फेऱ्या रद्द 

नाशिकमध्ये वाहतूक कोंडी होत असल्याने प्रशासनाने निर्णय घेत असल्याचं सांगितलं जातंय.शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचा नागरिकांचा आरोप होत आहे. त्यात प्रवासी संख्या कमी असलेल्या भागात रिकाम्या चालणाऱ्या 200 गाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबताची माहिती महापौर हिमगौरी आडके यांनी दिली.

शहरातील शेकडो नागरिक या सेवेचा लाभ घेत होते

नाशिक महानगरपालिकेच्या माध्यामातून शहरात सिटीलिंक बससेवा सुरू करण्यात आली होती. ही सेवा ग्रामीण भागातील नागरिकांनाही फायदेशीर ठरत होती. शहरातील शेकडो नागरिक या सेवेचा लाभ घेत होते.  ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थी या बसने येजा करत होते. ही सिटीलिंक बससेवा शहरातील कॉलेज, शाळा, उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत होती. परंतु प्रशासनाने अचानक 200 बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानं विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढू शकतात. .

नाशिकमध्ये खड्ड्यामुळे आणखी एकाचा मृत्यू

नाशिकमध्ये अपघातात जखमी झालेल्या दिलीप काळे यांचा 24 दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 20 जुलै रोजी त्र्यंबकेश्वर मार्गावर काळे यांना दुचाकी वाहनाने धडक दिली होती. अपघातात दिलीप काळे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. अपघात हा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झाल्याचा अपघातात मृत्यूमुखी पडल्याचा आरोप दिलीप काळे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. स्थानिक नगरसेवकांनीही सदर व्यक्तीचा मृत्यू हा रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात झाल्याने झाल्याचा दावा केला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या रस्ते अपघात समितीकडून या प्रकरणाची चौकशी करून सदरचा अपघात खड्ड्यांमुळे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे झाला आहे का, याची चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंचा फ्रुटी,कॅन्डी ज्यूस, अ‍ॅपे फिज वाल्यांना दणका; तब्बल 11 तास सुरु होती झडती

    सध्या सगळीकडे चर्चा आहे ते फक्त तुकाराम मुंडे यांच्या दणक्याची. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळखोर,अन्ना सुरक्षा मानकांचं उल्लंघन करणारे आणि नियम मोडणारी मोठमोठी हॉटेल्स, उपहारगृह आणि रेस्टॉरंट विरुद्ध…

    गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल थांबणार कधी? २७२ स्पेशल गाड्यांनंतरही चाकरमानी वाऱ्यावर, १५ ऑगस्टला बेलापूर मुख्यालयावर धडक

    गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाचा नियोजनाचा अभाव, मोजक्याच गाड्या…

    Leave a Reply

    You Missed

    डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंचा फ्रुटी,कॅन्डी ज्यूस, अ‍ॅपे फिज वाल्यांना दणका; तब्बल 11 तास सुरु होती झडती

    डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंचा फ्रुटी,कॅन्डी ज्यूस, अ‍ॅपे फिज वाल्यांना  दणका; तब्बल 11 तास सुरु होती झडती

    ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर बांगलादेशचा धक्का! पहिल्या डावात केलं चीतपट; पण सामन्याचा खरा हिरो ठरला तन्झिद हसन

    ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर बांगलादेशचा धक्का! पहिल्या डावात केलं चीतपट; पण सामन्याचा खरा हिरो ठरला तन्झिद हसन

    गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल थांबणार कधी? २७२ स्पेशल गाड्यांनंतरही चाकरमानी वाऱ्यावर, १५ ऑगस्टला बेलापूर मुख्यालयावर धडक

    गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल थांबणार कधी? २७२ स्पेशल गाड्यांनंतरही चाकरमानी वाऱ्यावर, १५ ऑगस्टला बेलापूर मुख्यालयावर धडक

    नाशिककरांचे हाल! सिटी लिंक बससेवा कोलमडली; तब्बल २०० फेऱ्या रद्द, महापौरांनी स्पष्ट केलं कारण

    नाशिककरांचे हाल! सिटी लिंक बससेवा कोलमडली; तब्बल २०० फेऱ्या रद्द, महापौरांनी स्पष्ट केलं कारण

    कॅगचा धक्कादायक अहवाल! भारतीय रेल्वेला १०० कमवण्यासाठी ९८.२२ चा खर्च; प्रवासी सेवांमध्ये हजारो कोटींचा तोटा

    कॅगचा धक्कादायक अहवाल! भारतीय रेल्वेला १०० कमवण्यासाठी ९८.२२ चा खर्च; प्रवासी सेवांमध्ये हजारो कोटींचा तोटा

    तुम्हीही फ्रिजमध्ये अन्न चुकीच्या पद्धतीने ठेवता का? ९०% लोक करतात ‘या’ ५ चुका; होऊ शकते विषबाधा

    तुम्हीही फ्रिजमध्ये अन्न चुकीच्या पद्धतीने ठेवता का? ९०% लोक करतात ‘या’ ५ चुका; होऊ शकते विषबाधा

    “RTI देणार नाही,काय करायचं ते कर!” इथेही घोटाळा? बाचेगावच्या ग्रामसेवकाची मुजोरी अन् तरुणाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल,

    “RTI देणार नाही,काय करायचं ते कर!” इथेही घोटाळा? बाचेगावच्या ग्रामसेवकाची मुजोरी अन् तरुणाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल,

    प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाला तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपरमधील आऊटलेट्स थेट बंद

    प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाला तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपरमधील आऊटलेट्स थेट बंद

    आदित्य ठाकरेंकडून कर्जतच्या ‘चिमुकल्या रिपोर्टर्स’चं कौतुक; थेट फोनवरून संवाद अन् मुलींना दिली सायकलींची भेट

    आदित्य ठाकरेंकडून कर्जतच्या ‘चिमुकल्या रिपोर्टर्स’चं कौतुक; थेट फोनवरून संवाद अन् मुलींना दिली सायकलींची भेट