अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार! मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन आणि अचानक पूर; ४ मृत्यू, ५ सैनिक बेपत्ता

शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशात हाहाकार माजला.सुबानसिरी जिल्ह्यातील केओजारिंग-बायचिंग रस्ता खोदण्याच्या ठिकाणी मोठे भूस्खलन झालं असून ज्यात अनेक कामगार आणि लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.

पुरात पाच जवान बेपत्ता 

राज्यातील दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे पसू पाणि आर्मी कॅम्पमधील दोन निवारा शेड वाहून गेले आहेत. यामध्ये ७ जवान वाहून गेले होते, त्यापैकी २ जणांची सुटका करण्यात आली आहे. या विध्वंसानंतर भारतीय लष्कराचे पाच जवान बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे.

अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात मोठी दरड कोसळली

अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात केोजारींग-ब्याचींग रस्ते बांधणीच्या ठिकाणी मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेत ४ जण जागीच दगावले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर कामगारांचा शोध घेतला जात आहे. सुबानसिरी जिल्ह्यातील केओजारिंग-बायचिंग रस्ता खोदण्याच्या ठिकाणी मोठा भूस्खलन झाल असून ज्यात अनेक कामगार आणि लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये ताडू बाकी, ताजी राय, मार्कोश बसुमतारी आणि बाबुल अली यांचा समावेश असल्याचं म्हटलं जातं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बाबुल अली यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला आहे.

लष्करी छावणीत अचानक पूर

दिबांग व्हॅली जिल्ह्यातील पसुपाणी लष्करी छावणीत मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात ५ व्या ग्रेनेडियर्सचे दोन निवारे वाहून गेले. पाण्याच्या जोरदार प्रवाहात सात सैनिक वाहून गेले. यापैकी दोघांना वाचवण्यात आले असून, पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता सैनिकांमध्ये हवालदार उपेंद्र, कुंदन, विनोद, आदित्य आणि समुंडा यांचा समावेश आहे.

जवानांचा शोध घेण्यासाठी ५ व्या ग्रेनेडियर्सची पथके तैनात करण्यात आली आहेत. आयटीबीपीची ५८ वी बटालियन, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनची ६२ आरसीसी , स्थानिक स्वयंसेवक आणि अरुणाचल प्रदेश पोलीस यांची संयुक्त पथके घटनास्थळी कार्यरत आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    १ कोटी तरुणांना AI ची ट्रेनिंग ते स्पर्धा परीक्षांसाठी फ्रि ऑनलाइन कोचिंग! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा

    देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशाची राजधानी दिल्लीतही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 व्यांदा भारतीयांना संबोधित केलं.…

    कॅगचा धक्कादायक अहवाल! भारतीय रेल्वेला १०० कमवण्यासाठी ९८.२२ चा खर्च; प्रवासी सेवांमध्ये हजारो कोटींचा तोटा

    भारताची ‘जीवनवाहिनी’ मानल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेच्या आर्थिक कारभाराबाबत कॅग (CAG) च्या २०२४-२५ च्या अहवालातून अनेक धक्कादायक आणि चिंताजनक बाबी समोर आल्या आहेत. रेल्वेवर दरवर्षी लाखो कोटी रुपयांचा खर्च होतो; पण…

    Leave a Reply

    You Missed

    अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार! मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन आणि अचानक पूर; ४ मृत्यू, ५ सैनिक बेपत्ता

    अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार! मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन आणि अचानक पूर; ४ मृत्यू, ५ सैनिक बेपत्ता

    या बायका मिसरी लावतात अन् गावभर हिंडतात…! चिुमकल्याची तुकाराम मुंढेंकडे मजेशीर तक्रार, पाहा VIDEO

    या बायका मिसरी लावतात अन् गावभर हिंडतात…! चिुमकल्याची तुकाराम मुंढेंकडे मजेशीर तक्रार, पाहा VIDEO

    १ कोटी तरुणांना AI ची ट्रेनिंग ते स्पर्धा परीक्षांसाठी फ्रि ऑनलाइन कोचिंग! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा

    १ कोटी तरुणांना AI ची ट्रेनिंग ते स्पर्धा परीक्षांसाठी फ्रि ऑनलाइन कोचिंग! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा

    डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंचा फ्रुटी,कॅन्डी ज्यूस, अ‍ॅपे फिज वाल्यांना दणका; तब्बल 11 तास सुरु होती झडती

    डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंचा फ्रुटी,कॅन्डी ज्यूस, अ‍ॅपे फिज वाल्यांना  दणका; तब्बल 11 तास सुरु होती झडती

    ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर बांगलादेशचा धक्का! पहिल्या डावात केलं चीतपट; पण सामन्याचा खरा हिरो ठरला तन्झिद हसन

    ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर बांगलादेशचा धक्का! पहिल्या डावात केलं चीतपट; पण सामन्याचा खरा हिरो ठरला तन्झिद हसन

    गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल थांबणार कधी? २७२ स्पेशल गाड्यांनंतरही चाकरमानी वाऱ्यावर, १५ ऑगस्टला बेलापूर मुख्यालयावर धडक

    गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल थांबणार कधी? २७२ स्पेशल गाड्यांनंतरही चाकरमानी वाऱ्यावर, १५ ऑगस्टला बेलापूर मुख्यालयावर धडक

    नाशिककरांचे हाल! सिटी लिंक बससेवा कोलमडली; तब्बल २०० फेऱ्या रद्द, महापौरांनी स्पष्ट केलं कारण

    नाशिककरांचे हाल! सिटी लिंक बससेवा कोलमडली; तब्बल २०० फेऱ्या रद्द, महापौरांनी स्पष्ट केलं कारण

    कॅगचा धक्कादायक अहवाल! भारतीय रेल्वेला १०० कमवण्यासाठी ९८.२२ चा खर्च; प्रवासी सेवांमध्ये हजारो कोटींचा तोटा

    कॅगचा धक्कादायक अहवाल! भारतीय रेल्वेला १०० कमवण्यासाठी ९८.२२ चा खर्च; प्रवासी सेवांमध्ये हजारो कोटींचा तोटा

    तुम्हीही फ्रिजमध्ये अन्न चुकीच्या पद्धतीने ठेवता का? ९०% लोक करतात ‘या’ ५ चुका; होऊ शकते विषबाधा

    तुम्हीही फ्रिजमध्ये अन्न चुकीच्या पद्धतीने ठेवता का? ९०% लोक करतात ‘या’ ५ चुका; होऊ शकते विषबाधा