शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशात हाहाकार माजला.सुबानसिरी जिल्ह्यातील केओजारिंग-बायचिंग रस्ता खोदण्याच्या ठिकाणी मोठे भूस्खलन झालं असून ज्यात अनेक कामगार आणि लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
पुरात पाच जवान बेपत्ता
राज्यातील दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे पसू पाणि आर्मी कॅम्पमधील दोन निवारा शेड वाहून गेले आहेत. यामध्ये ७ जवान वाहून गेले होते, त्यापैकी २ जणांची सुटका करण्यात आली आहे. या विध्वंसानंतर भारतीय लष्कराचे पाच जवान बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे.
अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात मोठी दरड कोसळली
अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात केोजारींग-ब्याचींग रस्ते बांधणीच्या ठिकाणी मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेत ४ जण जागीच दगावले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर कामगारांचा शोध घेतला जात आहे. सुबानसिरी जिल्ह्यातील केओजारिंग-बायचिंग रस्ता खोदण्याच्या ठिकाणी मोठा भूस्खलन झाल असून ज्यात अनेक कामगार आणि लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये ताडू बाकी, ताजी राय, मार्कोश बसुमतारी आणि बाबुल अली यांचा समावेश असल्याचं म्हटलं जातं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बाबुल अली यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला आहे.
लष्करी छावणीत अचानक पूर
दिबांग व्हॅली जिल्ह्यातील पसुपाणी लष्करी छावणीत मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात ५ व्या ग्रेनेडियर्सचे दोन निवारे वाहून गेले. पाण्याच्या जोरदार प्रवाहात सात सैनिक वाहून गेले. यापैकी दोघांना वाचवण्यात आले असून, पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता सैनिकांमध्ये हवालदार उपेंद्र, कुंदन, विनोद, आदित्य आणि समुंडा यांचा समावेश आहे.
जवानांचा शोध घेण्यासाठी ५ व्या ग्रेनेडियर्सची पथके तैनात करण्यात आली आहेत. आयटीबीपीची ५८ वी बटालियन, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनची ६२ आरसीसी , स्थानिक स्वयंसेवक आणि अरुणाचल प्रदेश पोलीस यांची संयुक्त पथके घटनास्थळी कार्यरत आहेत.








