नाशिकमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जिल्ह्यातील पेठ तालुक्यात बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. परिसरात जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मनुष्यहानी झालेली नाही. मात्र मागील महिनाभरात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सातत्याने होणार्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन, एकदरे परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरलं आहे. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मनुष्यहानी झालेली नाही. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत भीतीचं वातावरण
सकाळच्या सुमारास अनेक जण कामानिमित्त घराबाहेर पडले होते. अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली. जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे. मागील काही दिवसांत नाशिकमध्ये अनेकदा भूकंपाचे जाणवल्याचे समोर आलं आहे. मागील महिनभरात ५ ते ६ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. वारंवार होणार्या भूकंपामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत भीतीचं वातावरण आहे.
सोमावरीही भूकंपाचे 2 धक्के, पहाटे 2.5 तर दुपारी 3.2 रिश्टरचा धक्का बसला
नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, बागलाणसह त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील काही भागांना सोमवारीही भूकंपाचे दोन धक्के जाणवले होते. मुरुमदरी, रोकडपाडा, डोंगराळे, राहूड, उंबरपाडा दिगर आणि सरड परिसरात धक्क्यांची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन
मागील महिनाभरात नाशिक जिल्ह्यात ५ ते ६ वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याचे समोर आले आहे. वारंवार जाणवणाऱ्या या हादऱ्यांमुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. सकाळच्या वेळी अचानक धक्के जाणवल्याने काही नागरिकांची धावपळही झाली. वारंवार होणाऱ्या भूकंपाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच जिल्ह्यात वारंवार धक्क्यांचे कारण शोधण्यासाठी दिल्लीहून केंद्रीय पथकही नाशिकमध्ये आले होते. त्याने पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि मालेगाव या भागामध्ये भूकंपाच्या अद्ययावत आणि अचूक नोंदीसाठीचे आधुनिक यंत्रही बसवले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.








