छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयफोन 15 न दिल्यानं एका मुलाने चक्क स्वत:चं आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. फक्त या घटनेत फक्त त्या मुलाचाच नाही तर त्याच्या आई -वडिलांनी देखील जीव गेला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. देवळाली परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावरून पडून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

आयफोन 15 खरेदी करायचा हट्ट जीवावर बेतला

मुलगा कुणाल चांदगुडे वय 19 वर्ष, वडील मुरलीधर चांदगुडे वय 48 वर्ष आणि आई संगीता चांदगुडे अशी या घटनेतील मृतांची नावं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही कारणामुळे मुलगा कुणाल चांदगुडे यांचा आपल्या आई-वडिलांसोबत वाद झाला होता. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे कुणाला याला आयफोन 15 खरेदी करायचा होता, त्यासाठी तो हट्टाला पेटला होता. यावरूनच त्याचा त्याच्या आई -वडिलांसोबत वाद झाला. या वादानंतर मनात राग असल्याने तो आत्महत्या करण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. त्याच्या पाठोपाठ त्याचे आई-वडील देखील डोंगरावर पोहोचले, परंतु कुणाला हा कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

आई-वडिलांनी या डोंगरावर तब्बल तीन तास त्याची समजूत काढली

त्याच्या आई-वडिलांनी या डोंगरावर तब्बल तीन तास त्याची समजूत काढली, तो डोंगराच्या अत्यंत उंच असलेल्या भागावर उभा होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. आई-वडील आणि स्थानिक लोकांकडून तब्बल तीन तास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलिसांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली, मात्र तो काही डोंगरावरून खाली उतरण्यास तयार नव्हता.

एका आयफोनमुळे अख्खं घरं संपलं

शेवटी वडिलांचा संयम सुटला आणि त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये दोघही डोंगरावरून खाली कोसळल्याचं म्हटलं जातं. तर काहींच्या माहितीनुसार त्या वादात मुलांसोबत त्या दोघांनीही उडी मारली. पण एका आयफोनमुळे अख्खं घरं संपलं ही गोष्ट मात्र तेवढीच धक्कादायक आणि हादरवणारी आहे. या दुर्दैवी घटनेत तिघांचाही मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

डोंगर अवैध उत्खननामुळे बनला मृत्यूचा सापळा

मात्र, या भीषण घटनेमुळे तिसगाव परिसरातील मुख्य धुळे-सोलापूर महामार्गावर असलेल्या खवड्या डोंगराचे एक अत्यंत भयानक वास्तव समोर आले आहे. हा डोंगर आता केवळ नैसर्गिक डोंगर राहिलेला नसून वारेमाप अवैध उत्खननामुळे तो थेट मृत्यूचा सापळा म्हणजेच ‘सुसाइड पॉइंट’ बनला आहे. डोंगराची पाहणी केल्यानंतर प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आणि निसर्गाच्या ऱ्हासाचे वास्तव समोर आले आहे.

कारण एका बाजूला डोंगर पोखरून पर्यावरणाचा विनाश केला जात आहे. दुसरीकडे तोच पोखरलेला डोंगर आता माणसांचे बळी घेत आहे. चांदगुडे कुटुंबाची घटना हे प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. या कड्याच्या परिसरात तातडीने मजबूत कुंपण उभारावे, सुरक्षा रक्षकांची नेमणू करावी, अन्यथा खवड्या डोंगर भविष्यात असेच अनेकांचे बळी जात राहतील.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच