अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशू अतिदक्षता विभागात म्हणजे SNCUमध्ये अचानक आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा धुरामुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आग लागल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करत इतर बालकांना कक्षाबाहेर काढले. प्राथमिक माहितीनुसार, पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान नवजात शिशू अतिदक्षता विभागातील एका व्हेंटिलेटरमध्ये अचानक बिघाड होऊन स्फोट झाला. त्यानंतर कक्षात आग लागली आणि काही वेळातच धूर मोठ्या प्रमाणात पसरला. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं.

काही बालकांवर सुपर स्पेशालिटीत उपचार

आग लागलेल्या कक्षात त्यावेळी १२ नवजात बालकांवर उपचार सुरू होते. आग आणि धूर लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. मात्र, या प्रयत्नांदरम्यान तीन नवजात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. आगीतून वाचवण्यात आलेल्या काही बालकांना पुढील उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चार बालकांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्या हाताला आणि पायाला भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अन्य काही बालकांना किरकोळ भाजल्याची माहिती आहे. काही बालकांना डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे.

३ नवजातांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाणार

या दुर्घटनेत तीन नवजातांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या घटनेवर आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ३ नवजातांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचं मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितली.

अमरावतीमधील घटनेची माहिती घेतल्यानंतर मंत्री आबिटकर म्हणाले, ‘ अमरावतीमध्ये स्फोट झाला की शॉर्ट सर्किट झाला, हे स्पष्ट व्हायचं आहे. रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी बाळांना वाचवण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून जीव वाचवला. दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला. या बालकांना वाचवता आले नाही. दुर्घटनेनंतर इतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही खासगीमध्ये आहेत. तर सरकारीमध्ये आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते आता सुरक्षित आहेत. दुर्दैवाने तिघांना वाचवता आलं नाही, असेही त्यांनी सांगितले.

अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे, नवीन इमारतीतील हा नवजात शिशू अतिदक्षता विभाग काही काळापूर्वीच सुरू करण्यात आला होता. कमी वजनाचे, कमी दिवसांचे आणि गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर या विभागात उपचार केले जातात. त्यामुळे अशा संवेदनशील विभागात आग लागल्यानंतर अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था कितपत सक्षम होती, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

    या गॅसच्या संपर्कात आल्याने 40 हून अधिक नागरिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला असून, 15 पेक्षा अधिक जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूरमधील गोधनी…

    समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

    मनोरी-गोराई परिसरातील समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून गोडे पाणी तयार करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे समुद्री पर्यावरण, मत्स्यसंपदा आणि…

    Leave a Reply

    You Missed

    नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

    नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

    अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

    अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

    समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

    समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

    जिद्द, कष्ट आणि यश! पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राचा डंका,पटेल वाडीतील गायत्रीने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण

    जिद्द, कष्ट आणि यश! पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राचा डंका,पटेल वाडीतील गायत्रीने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण

    माणगावातील धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी

    माणगावातील धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी

    छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना

    छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना

    उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवक पदावर टांगती तलवार

    उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवक पदावर टांगती तलवार

    मुंबईकरांच्या खिशाला कात्री; 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ, मुंबई, ठाणेसह कुठे होणार भाडेवाढ?

    मुंबईकरांच्या खिशाला कात्री; 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ, मुंबई, ठाणेसह कुठे होणार भाडेवाढ?

    मुंबईत मध्यरात्री भीषण दुर्घटना! कुर्ल्यात क्रेन कोसळून ८ ते १० जण जखमी, दोन घरांवर कोसळला ढिगारा

    मुंबईत मध्यरात्री भीषण दुर्घटना! कुर्ल्यात क्रेन कोसळून ८ ते १० जण जखमी, दोन घरांवर कोसळला ढिगारा