नेपाळमध्ये हाय अलर्ट जारी! हवामानही स्वच्छ असतानाही नेपाळमध्ये भीषण पूर, ७ जणांचा मृत्यू, ४१ हून अधिक बेपत्ता

उत्तरी नेपाळमध्ये बुधवारी सकाळी अचानक महापूर आल्याने सीमावर्ती भागातील वस्त्यांमध्ये प्रचंड हाहाकार माजला आहे. या आपत्तीमुळे सखल भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ‘भोटे कोशी’ नदीला अचानक भीषण पूर आला. हा पुराचा पाण्याचा लोट तिबेटच्या बाजूने आल्याचे सांगण्यात येत आहे.

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात अचानक भीषण पूर

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झाली आहे. या पुरात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 41 हून अधिक जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. तिबेटमधून नेपाळमध्ये येणाऱ्या भोटेकोशी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने नदीकाठच्या परिसरात हाहाकार उडाला. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि लगतच्या स्याफ्रुबेसी परिसरात प्रचंड नुकसान झालं आहे. या प्रवाहात अनेक वाहने, सामान व मालमत्ता वाहून गेली आहे.

या अचानक आलेल्या पुरात अनेक बाजारपेठा पाण्याखाली गेल्या असून काही जलविद्युत प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले आहे. परिस्थिती गंभीर असल्याने प्रशासनाने त्रिशूली नदीच्या खालच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केलं आहे.

पोलीस अन् जवानांना तैनात करण्यात आलं आहे

नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, भीषण पुराची परिस्थिती पाहता बचाव आणि मदत कार्य तीव्र करण्यासाठी रसुवा व आसपासच्या भागात नेपाळ सेना, सशस्त्र पोलीस बळ आणि नेपाळ जवानांना तैनात करण्यात आले आहे. पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना आखण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.

हवामानही स्वच्छ असतानाही, पुरामागचं नेमके कारण काय?

या पुरामागचं नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रसुवा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा अधिकारी नरेंद्र परियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालय आणि आसपासच्या भागात पाऊसच झाला नव्हता. हवामानही स्वच्छ होते. त्यामुळे कोणताही मोठा पाऊस न पडता नदीला अचानक एवढा प्रचंड पूर कसा आला, याबद्दल तपास सुरु आहे. प्रशासनाने वरच्या हिमालयीन भागात एखादे हिमनदी तलाव फुटले असावे किंवा पाण्याचा तात्पुरता अडथळा तुटला असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतपणे स्पष्ट कारण समोर आलेले नाही. नदीतील पाण्याचा जोर कायम असल्याने नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांतील काही भागांवरही पुराचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या भागातील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    अमेरिकेत गणपतींच्या मूर्तींची किंमती ऐकून थक्क व्हाल; मराठी महिलेनं काढलेला बाप्पाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

    सध्या देशभरात बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आहे. बाप्पासाठी घरांपासून ते मंडळांपर्यंत सर्वांनीच जय्यत तयारी केली आहे. अगदी महिनाभर आधीपासूनच आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालेली असते. सुरुवात होती ती बाप्पाची…

    “सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

    प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने हे त्यांच्या अभिनय कौशल्यासोबतच सोशल मीडियावर स्पष्ट राजकीय आणि सामाजिक भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांच्या आयटी सेल (IT Cell),…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच