अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

राज्य सरकारकडून अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. प्रवाशांसोबत जुजबी मराठी तरी बोलता यावी, अशी सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर इथल्या मातीतली मराठी भाषा रिक्षा आणि टॅक्सी चालकांना यावी, अशी सरकारची भूमिका आहे. राज्य सरकारकडून याआधी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही मराठी शिकता आली नाही तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे थेट परवाना आणि बॅच निलंबित केले जातील, असा इशारा देण्यात आला होता. पण आता ही सर्व कारवाई पुढचे एक वर्ष तरी होणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

अमराठी ऑटो आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा

अमराठी ऑटो आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाचा अतिरिक्त कालावधी दिला आहे. या कालावधीत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही किंवा त्यांचा परवाना रद्द केला जाणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी याबबातची घोषणा केली आहे. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे स्पष्ट केलं की, राज्यातील गैर-मराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन ही विनंती केल्यानंतर ही मुदत वाढवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.

टॅक्सी आणि रिक्षा चालकांना एक वर्षाची मुदतवाढ

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी आज हा निर्णय घेतला आहे की, या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना एक वर्षाची मुदतवाढ दिली जाईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही. या एक वर्षात वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करुन, जुजबी मराठी सर्व ऑटो आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील. ते स्वत:हून समोर आलेले आहेत. त्यामुळे त्यांना वेळ देणं गरजेचं होतं. म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे”, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

ऑटो आणि रिक्षा चालकांनी घेतली फडणवीसांची भेट 

हाजी अराफत यांच्या नेतृत्वाखालील ऑटो आणि रिक्षा चालकांनी गुरुवारी फडणवीसांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मराठी भाषेच्या गरजेला पाठिंबा दर्शवला. मराठी शिकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यातही हे प्रयत्न सुरूच राहतील मात्र, विविध वयोगटांतील रिक्षा आणि टॅक्सी चालक अल्पावधीत मराठी शिकू शकणार नाहीत. त्यांच्या या विनंतीनंतर या अमराठी रिक्षा आणि ऑटो चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं फडणवीसांनी म्हटलं.

इतक्या कमी वेळात शिकणे कठीण

महाराष्ट्रात सर्व चालकांना जुजबी मराठी बोलता आले पाहिजे याबाबत त्यांचे समर्थनच आहे. ते शिकण्याचा प्रयत्नही करत आहेत. पण चालक विविध वयोगटातील असल्याने त्यांना इतक्या कमी वेळात मराठी शिकणे शक्य नसल्याची अडचण सांगत त्यांनी मुदतवाढ मागितली. ही मागणी मान्य करत त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली असून या वर्षभरात ते क्लासेस तसेच इतर माध्यमातून मराठी शिकतील. या दरम्यान त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सुभाष चंद्र यांना मोठा दिलासा! २२,००६ कोटींचे कर्ज अन् ६.५ कोटींची सेटलमेंट; NCLT चे शिक्कामोर्तब

    NCLT ने झी ग्रुपचे Zee Group संस्थापक आणि मिडिया उद्योगपती सुभाष चंद्र यांना वैयक्तिक दिवाळखोरी प्रकरणातून मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीएलटीने सुमारे २,२०,०६.५७ कोटी रुपयांच्या कर्जाचे निराकरण करण्यासाठी अवघ्या ६.५…

    उकाड्याने मुंबईकर बेजार; राज्यात पाऊस गायब, महाराष्ट्रातील हवामानाची सध्य स्थिती काय?

    महाराष्ट्रात पावसाचा जोर हळू हळू कमी होऊ लागला आहे. अचानक पावसाने दडी मारली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर काही भागांत पावसाची मध्यम स्थिती…

    Leave a Reply

    You Missed

    अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

    अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

    सुभाष चंद्र यांना मोठा दिलासा! २२,००६ कोटींचे कर्ज अन् ६.५ कोटींची सेटलमेंट; NCLT चे शिक्कामोर्तब

    सुभाष चंद्र यांना मोठा दिलासा! २२,००६ कोटींचे कर्ज अन् ६.५ कोटींची सेटलमेंट; NCLT चे शिक्कामोर्तब

    नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरात १६५ जणांचा मृत्यू; १४२ भारतीयांसह शेकडो विदेशी नागरिकही बेपत्ता

    नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरात १६५ जणांचा मृत्यू; १४२ भारतीयांसह शेकडो विदेशी नागरिकही बेपत्ता
    उकाड्याने मुंबईकर बेजार; राज्यात पाऊस गायब, महाराष्ट्रातील हवामानाची सध्य स्थिती काय?

    लाडकी बहिणांची चिंता वाढणार! ‘लाडकी बहीण योजने’बाबत सरकारचा मोठा निर्णय

    लाडकी बहिणांची चिंता वाढणार! ‘लाडकी बहीण योजने’बाबत सरकारचा मोठा निर्णय

    नेपाळमध्ये हाय अलर्ट जारी! हवामानही स्वच्छ असतानाही नेपाळमध्ये भीषण पूर, ७ जणांचा मृत्यू, ४१ हून अधिक बेपत्ता

    नेपाळमध्ये हाय अलर्ट जारी! हवामानही स्वच्छ असतानाही नेपाळमध्ये भीषण पूर, ७ जणांचा मृत्यू, ४१ हून अधिक बेपत्ता

    गणेशोत्सवासाठी नवे नियम! भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींच्या सुरक्षेसाठी नवीन नियम लागू

    गणेशोत्सवासाठी नवे नियम! भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींच्या सुरक्षेसाठी नवीन नियम लागू

    इस्रोचा मोठा निर्णय! इस्रो रॉकेट बनवणे थांबवणार; आता रॉकेट आणि उपग्रह निर्मिती खाजगी कंपन्यांकडे

    इस्रोचा मोठा निर्णय! इस्रो रॉकेट बनवणे थांबवणार; आता रॉकेट आणि उपग्रह निर्मिती खाजगी कंपन्यांकडे

    धोतऱ्याचे फळ अन् बिया विकणे महागात! Amazon, Swiggy Instamart आणि BigBasket चे अन्न परवाने थेट निलंबित

    धोतऱ्याचे फळ अन् बिया विकणे महागात! Amazon, Swiggy Instamart आणि BigBasket चे अन्न परवाने थेट निलंबित