रायगड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सध्या एकाच नावाचा आणि एकाच दौऱ्याचा दबदबा पाहायला मिळत आहे आणि तो म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड लोकसभा संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांचा. गेल्या दोन महिन्यांपासून रायगड जिल्ह्यात ठाकरे गटाची जी जोरदार चर्चा सुरू आहे, त्यामागे संजय मानाजी कदम यांचे आक्रमक नेतृत्व आणि सर्वसामान्य जनतेशी असलेला त्यांचा थेट संवाद हेच मुख्य कारण ठरत आहे.
आक्रमक आंदोलनाने रोखले लक्ष
या राजकीय वातावरणाची खरी सुरुवात झाली ती कोकणातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या दयनीय अवस्थेविरोधात केलेल्या आंदोलनापासून. संजय मानाजी कदम यांच्या नेतृत्वात झालेल्या आक्रमक रस्ता रोको आणि निदर्शनांमुळे प्रशासनाची झोप उडाली आणि कोकणवासीयांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली गेली.
संजय मानाजी कदम यांनी कामाचा वेग मंदावू दिला नाही
त्यानंतर थेट जनतेशी संवाद साधणारे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा रायगड दौरा पार पडला. या दौऱ्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. पण त्या दौऱ्यानंतरही संजय मानाजी कदम यांनी कामाचा वेग मंदावू दिला नाही. त्यांनी जनतेच्या समस्या जाणूून घेण्यासाठी सर्व प्रयत्न सुरुच ठेवले.
संजय मानाजी कदम यांनी रायगड जिल्हा अक्षरशः पिंजून काढला
गुहागर ते श्रीवर्धन सर्वच भागांची पाहणी केली, अगदी दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी केली. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर संजय मानाजी कदम यांनी संपूर्ण रायगड जिल्हा अक्षरशः पिंजून काढला आहे. गुहागर, माणगाव, महाडपासून ते थेट श्रीवर्धनपर्यंतच्या गावागावांत आणि घरोघरी ते पोहोचले आहेत.
जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी घेतला पुढाकार
विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या काळात रात्री एक-दोन वाजेपर्यंत त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या. या भेटी केवळ औपचारिक किंवा निवडणुकीपुरत्या मर्यादित नव्हत्या.तर जनतेच्या अडचणी आणि दैनंदिन समस्या स्वतः जाणून घेण्यासाठी घेतलेला हा थेट पुढाकार होता.
ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान
संजय मानाजी कदम यांनी या दौऱ्यादरम्यान पक्षाच्या जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा जाहीर सत्कार केला. पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या वरिष्ठ आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचा त्यांनी घरोघरी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला तसेच व त्यांचे आशीर्वाद घेतले.
शिवसेना शाखा नव्याने उभ्या करण्याचा संकल्प
एवढंच नाही तर अनेक ठिकाणी दुर्लक्षित किंवा निष्प्रभ झालेल्या शिवसेना शाखांचे पुनरुज्जीवन करण्याचा ठाम संकल्प त्यांनी केला आहे.राजकीय उलथापालथीमुळे मोडकळीस आलेल्या शिवसेना शाखा नव्याने उभ्या करण्याचा संकल्प त्यांनी केला. ‘गाव तिथे शाखा, शाखा तिथे प्रमुख’ या सूत्रावर भर देत त्यांनी रायगड जिल्ह्यात मजबूत संघटनात्मक जाळे विणण्यास सुरुवात केली आहे.
रस्त्यांची पाहणी अन् अडचणींची नोंद
दौऱ्यादरम्यान संजय मानाजी कदम यांनी केवळ राजकीय भाषणे न देता नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि स्थानिक खेळाडूंच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेतल्या. अनेक ठिकाणी बिकट झालेल्या रस्त्यांची स्वतः पाहणी करून प्रत्येक समस्येची गांभीर्याने नोंद घेतली.
युवा पदाधिकाऱ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा
त्यांच्या या सातत्यपूर्ण संपर्कामुळे आणि जमिनीवर उतरून काम करण्याच्या धडपडीमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक, महिला आघाडी आणि युवा पदाधिकाऱ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि मोठा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.








