“धूर निघत असतानाही ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं”, धावत्या AC स्लीपर बसने घेतला पेट; ९ प्रवासी जिवंत जळाले

NCR ला लागून असलेल्या ग्रेटर नोएडाच्या यमुना एक्सप्रेसवेवर एक दुर्देवी घटना घडली आहे. नोएडा येथून महोबाला चाललेल्या एका खासगी डबल डेकर स्लीपर AC बसने अचानक पेट घेतला. या भयानक दुर्घटनेत 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रवासी जिवंत जळाले तर काहींचा श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाला.

AC बसने अचानक पेट घेतला, काही प्रवासी जिवंत जळाले 

राज कल्पना ट्रॅवल्सची स्लीपर बस दिल्लीहून महोबाच्या दिशेने जात होती. बसमध्ये साधारण ४० ते ५० प्रवासी होते. प्रवासी गाढ झोपेत असताना, बुधवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. ही बस ग्रेटर नोएडा येथून बस आग्र्याच्या दिशेने जात असताना यमुना एक्सप्रेस वे वरील दयानतपुर गावाजवळ ही दुर्घटना घडली. ही प्रायवेट डबल डेकर बस दयानतपूर गावाजवळ पोहोचताच अचानक बसमधून धूर येऊ लागला. बसला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. चालकाने प्रसंगावधान दाखवत लगेच बस एक्सप्रेस वेच्या कडेला उभी केली. लगेच संपूर्ण बसने पेट घेतला. पाहता-पाहता बस आगीचा गोळा बनली. आतमधल्या प्रवाशांना काही समजण्याआधीच संपूर्ण बसला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. बसच्या आतून ओरडण्याचे, किंचाळण्याचे आवाज येत होते.

बचावलेल्या प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितलेला अनुभव 

या दुर्घटनेतून बचावलेल्या महिलेनं सांगितलं की, “झोपेत असतानाच कोणीतरी दरवाजा जोरात वाजवून बसला आग लागल्याचे सांगितले. बसच्या इंजिनच्या बाजूला आणि ड्रायव्हरच्या केबिनमधून अचानक काहीतरी जळण्याचा वास येऊ लागला आणि धूर येत होता. आरडाओरडा, पळापळ सुरु होती. मी माझं सामान, बूट काही उचललं नाही. फक्त फोन हातात घेतला आणि बाहेरच्या बाजूला सगळे पळालो. बसमध्ये इतका धूर होता की, आतमध्ये काही दिसत नव्हतं. श्वास कोंडला गेल्यामुळे लोक आत तडफडत होते. मागे काही लोक अडकलेले ते बाहेर निघू शकले नाहीत. जीव वाचवण्यासाठी लोक एकमेकांना धक्के देत बाहेर पडत होते.”

चालकाने  दुर्लक्ष केलं

तसंच काही या दुर्घटनेत बचावलेल्या काही प्रवाशांनी हे देखील सांगितलं की चालकाला बसच्या इंजिनच्या बाजूला आणि ड्रायव्हरच्या केबिनमधून अचानक काहीतरी जळण्याचा वास येऊ लागला आणि धूर येत असल्याची याची माहितीही दिली होती, मात्र चालकाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

आगीचं कारण काय?

दुर्घटनेची माहिती मिळताच यमुना एक्सप्रेस वे चे खासगी सुरक्षारक्षक, फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि बचाव पथकाने अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवलं. होरपळलेल्या प्रवाशांना लगेच नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. प्रारंभिक चौकशीत शॉर्ट सर्किटला आगीचं कारण मानलं जातय. पोलीस अपघाताची सखोल चौकशी करत आहे.

योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेची माहिती घेतली. सीएम योगींनी जिवीतहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. ज्यांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलय त्यांच्या कुटुंबियांबद्दल दु:ख व्यक्त केलं. सीएम योगींनी अपघातातील जखमींना चांगल्यात चांगले उपचार देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत लोक कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने भव्य कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात लेखक गोरक्षनाथ पवार लिखित ‘चमकणारे दिवे (भाग २)’ या पुस्तकाचा…

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    १५ ऑक्टोबरपासून २००० पेक्षा जास्त रकमेच्या निवडक UPI व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजे MDR लागू होणार आहे. मात्र, हे शुल्क केवळ व्यापाऱ्यांनाच म्हणजेच मर्चंट्सनाच भरावे लागणार आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये MDR…

    Leave a Reply

    You Missed

    ‘मुंबईच्या राजा’चं यंदा ऐतिहासिक विसर्जन! गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार विसर्जनाबाबत ‘हा’ प्रयोग

    ‘मुंबईच्या राजा’चं यंदा ऐतिहासिक विसर्जन! गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार विसर्जनाबाबत ‘हा’ प्रयोग

    “धूर निघत असतानाही ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं”, धावत्या AC स्लीपर बसने घेतला पेट; ९ प्रवासी जिवंत जळाले

    “धूर निघत असतानाही ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं”, धावत्या AC स्लीपर बसने घेतला पेट; ९ प्रवासी जिवंत जळाले

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र