रिक्षातून किंवा व्हॅनमधून आपल्या मुलांना शाळेत पाठवताना पालकांना किती विश्वास असतो. पण आता भिवंडीतील एका घटनेमुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भिवंडीच्या रोशन बाग परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे.जे पाहून कोणत्याही पालकांच्या काळजाचा ठोका चुकेल.
एका रिक्षातून तब्बल १७ शाळकरी विद्यार्थ्यांना कोंबून नेत असल्याचा प्रकार
भिवंडीच्या रोशन बाग परिसरात रोशन बाग परिसरात एमएच ०४ एचझेड ८६८० क्रमांकाच्या रिक्षातून क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त, तब्बल 17 शाळकरी मुलांना खचाखच भरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. होय,एका रिक्षातून तब्बल १७ शाळकरी विद्यार्थ्यांना कोंबून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि शालेय वाहतुकीतील बेशिस्तीबाबत सर्वत्र तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
वाहन चालकाचा बेजबाबदारपणा
व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये, एका तीनचाकी ऑटो-रिक्षातून एकापाठोपाठ एक तब्बल 17 मुले बाहेर पडताना दिसत आहेत. वाहन चालकाच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे चिमुकल्यांचा जीव धोक्यात आल्याचे दिसून आलं. म्हणून एका नागरिकाने याबद्दल त्या रिक्षा चालकाला जाब विचारला तसेच या नागरिकाने तत्काळ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा प्रकार कैद केला.
Bhiwandi, Maharashtra – A video showing an auto-rickshaw allegedly carrying 17 schoolchildren has surfaced from the Roshan Bagh area of Bhiwandi, raising serious concerns over the safety of students travelling to and from school.The footage, which has been widely circulated on social media, reportedly shows a large number of children packed inside the three-wheeler, far beyond its normal passenger capacity.The video has prompted concern among local residents, who have questioned the safety arrangements for schoolchildren and the enforcement of passenger limits in auto-rickshaws. Following the circulation of the video, local police reportedly initiated action against the auto-rickshaw driver. Further details regarding the action taken and the applicable violations are awaited.
— NextMinute News (@nextminutenews7) September 24, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नक्कीच गांभीर्याने पुढे येतो
याबाबत विचारणा केल्यावर चालकाने अत्यंत बेजबाबदारपणे उत्तर दिले की, तो दररोज सुमारे 15 विद्यार्थ्यांना घेऊन जातो आणि त्या दिवशी काही अतिरिक्त मुले आल्याने त्यांना त्याच रिक्षात तडजोड करून घेऊन आल्याचं त्याने म्हटलं. दरम्यान, रिक्षाचालकाने संबंधित नागरिकाची माफी मागितल्याचेही दिसून आलं. पण या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नक्कीच गांभीर्याने पुढे येतो.
पोलिसांकडून कारवाई
दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने दखल घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधित ऑटो-रिक्षा चालकाविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. या गंभीर घटनेमुळे आता शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाकडून कडक नियंत्रण ठेवण्याची आणि सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे. तर, स्थानिक रहिवाशांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.








