‘दि प्राइड इंडिया’ आणि ‘महानगर गॅस’तर्फे श्रीवर्धनमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न; स्वरा कांबळे ठरली प्रथम विजेती

‘दि प्राइड इंडिया’ आणि ‘महानगर गॅस’ यांच्या संयुक्त विद्यमाने गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, श्रीवर्धन येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आलं होतं. ‘आधुनिक भारत’ या महत्त्वपूर्ण विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत श्रीवर्धन तालुक्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भाग घेत आपले विचार मांडले आहेत.

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला वाव देणे आणि त्यांच्यातील विचारांना व्यासपीठ मिळवून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी ‘आधुनिक भारत’ या विषयाच्या विविध पैलूंवर आणि देशाच्या प्रगतीवर प्रभावीपणे भाष्य केलं आहे.

देशाच्या प्रगतीवर प्रभावीपणे भाष्य केलं आहे

स्पर्धकांपैकी आपल्या उत्कृष्ट वकृत्वशैलीनं स्वरा कांबळे,गार्गी पेंढारी,अनामिका भुवड या विद्यार्थीनींनी यश संपादन केलं आहे.यात स्वरा कांबळे हीने प्रथम क्रमांक पटकावला आहे, गार्गी पेंढारी हीने द्वितीय क्रमांक तर,अनामिका भुवडने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

परीक्षकांचे मार्गदर्शन व आभार प्रदर्शन

या स्पर्धेचे परीक्षण महाड येथील शिवव्याख्याती कु. पूर्वा आनंद सुर्वे तसेच अ‍ॅड. पूजा सहदेव दुर्गावले यांनी केले. दोन्ही परीक्षकांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्वाचे बारकावे आणि प्रभावी संवाद कौशल्याबाबत मार्गदर्शन केले, तसेच सर्व सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘दि प्राइड इंडिया’चे मॅनेजर वसंत मोरे, को-ऑर्डिनेटर किरण जाधव आणि डॉ. किशोर शिताळे यांच्यासह संपूर्ण ‘दि प्राइड इंडिया’ व ‘महानगर गॅस’च्या टीमने मोलाचे परिश्रम घेतले. उपस्थितांनी व परीक्षकांनी आयोजकांचे तसेच कॉलेज प्रशासनाचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना! शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च शिवसेना उचलणार; उपमुख्यमंञी शिंदेंनी दिला थेट शब्द

    मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी दौरा केल्यानंतर राज्यात काही तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांसाठी काही सवलती जाहीर केल्या आहेत. तर आता उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांबद्दल एक महत्त्वाची घोषणा…

    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने अपघात; कार थेट कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे हा अपघात झाला आहे.कारने समोरून जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं कारण समोर आलं…

    Leave a Reply

    You Missed

    ‘दि प्राइड इंडिया’ आणि ‘महानगर गॅस’तर्फे श्रीवर्धनमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न; स्वरा कांबळे ठरली प्रथम विजेती

    ‘दि प्राइड इंडिया’ आणि ‘महानगर गॅस’तर्फे श्रीवर्धनमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न; स्वरा कांबळे ठरली प्रथम विजेती

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना! शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च शिवसेना उचलणार; उपमुख्यमंञी शिंदेंनी दिला थेट शब्द

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना! शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च शिवसेना उचलणार; उपमुख्यमंञी शिंदेंनी दिला थेट शब्द

    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने अपघात; कार थेट कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने अपघात; कार थेट कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    SIR च्या मुद्द्यावर ठाकरे बंधूं पुन्हा एकञ; ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार भव्य ‘जनमोर्चा’, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

    SIR च्या मुद्द्यावर ठाकरे बंधूं पुन्हा एकञ; ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार भव्य ‘जनमोर्चा’, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

    मुख्यमंञ्यांनी शब्द पाळला! अखेर राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर,शेतकऱ्यांना मोठा दिलासा; काय मदत मिळणार?

    मुख्यमंञ्यांनी शब्द पाळला! अखेर राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर,शेतकऱ्यांना मोठा दिलासा; काय मदत मिळणार?

    २० तासांच्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’ गिरगाव चौपाटीवर पोहोचला! कोळी बांधवांच्या हस्ते विसर्जन; शेवटच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर, यंदाही राजाच्या विसर्जनाला विलंब

    २० तासांच्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’ गिरगाव चौपाटीवर पोहोचला! कोळी बांधवांच्या हस्ते विसर्जन; शेवटच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर, यंदाही राजाच्या विसर्जनाला विलंब

    भुलेश्वरच्या मूर्ती दुर्घटनेनंतर विसर्जनादरम्यान ही 21 फूट उंच भव्य गणेशमूर्ती कोसळली; ट्रॉलीमधून मूर्ती विसर्जनासाठी नेली जात असतानाच…, गणेशभक्तांमध्ये हळहळ

    भुलेश्वरच्या मूर्ती दुर्घटनेनंतर विसर्जनादरम्यान ही 21 फूट उंच भव्य गणेशमूर्ती कोसळली; ट्रॉलीमधून मूर्ती विसर्जनासाठी नेली जात असतानाच…, गणेशभक्तांमध्ये हळहळ

    भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार! एकाच रिक्षात १७ शाळकरी मुलांना कोंबलं;धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

    भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार! एकाच रिक्षात १७ शाळकरी मुलांना कोंबलं;धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

    मुंबईत लाडक्या गणरायाला निरोप! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सूचना जारी

    मुंबईत लाडक्या गणरायाला निरोप! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सूचना जारी