अस्वच्छतेचा कहर! किचनमध्ये झुरळे, उंदरांची विष्ठा अन् रक्ताने भरलेला फ्रीज; मुंबईतील ‘या’प्रसिद्ध हॉटेलवर एफडीएची मोठी कारवाई, थेट परवाना निलंबित

मुंबईतील आणखी एका प्रसिद्ध हॉटेलवर FDA ने धडक कारवाई केली आहे. अन्न तयार करण्याच्या आणि साठवणुकीच्या ठिकाणी गंभीर स्वच्छता व अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्याचा एफडीएचा दावा आहे. या हॉटेल आस्थापनाचा एफएसएसआय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध खाद्य आस्थापनावर एफडीएची मोठी कारवाई

मुंबईतील प्रसिद्ध ‘कयानी ॲण्ड कंपनी’ या खाद्य आस्थापनावर अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएने मोठी कारवाई केली आहे. काळबादेवी येथील आस्थापनाची 27 सप्टेंबर रोजी तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान अन्न तयार करण्याच्या आणि साठवणुकीच्या ठिकाणी गंभीर स्वच्छता व अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्याचा एफडीएचा दावा आहे. त्यानंतर आस्थापनाचा एफएसएसआय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून अन्नपदार्थांची खरेदी, उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विक्री आणि वितरण बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

किचनमध्ये झुरळ आणि उंदरांची विष्ठा

एफडीएच्या तपासणीत अन्न तयार करण्याच्या ठिकाणी मांजर आणि उंदरांची विष्ठा आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर जिवंत माश्या आणि मृत झुरळेही आढळल्याचा दावा एफडीएने केला आहे. अन्न तयार करण्याच्या परिसरातील या परिस्थितीमुळे खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत नक्कीच गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

रेफ्रिजरेटरमध्ये साचले होते रक्त

तपासणीदरम्यान रेफ्रिजरेटरमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त साचल्याचे आढळल्याची नोंद एफडीएने केली आहे. तसेच प्रक्रिया विभागात उघडे सांडपाण्याचे मॅनहोल आढळल्याची माहिती देण्यात आली. अन्नपदार्थ तयार होत असलेल्या ठिकाणी अनेक प्रकारच्या त्रुटी आढळल्या तसेच तिथे बनवण्यात येणारे अन्न दूषित होण्याचा धोका असल्याचं लक्षात प्रशासनाने थेट कारवाई केली आहे.

अन्नपदार्थ थेट जमिनीवर; वर्तमानपत्राचा वापर

FDAच्या तपासणीत काही अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आल्याचे आढळले. त्याशिवाय कच्चे पीठ छापील वर्तमानपत्राने झाकून ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले. कच्चे आणि तयार अन्नपदार्थ योग्य पद्धतीने वेगळे ठेवले नसल्याचेही तपासणीत समोर आले. यामुळे कच्च्या पदार्थांमधून तयार अन्नपदार्थ दूषित होण्याची शक्यता निर्माण होते.

कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेबाबतही आक्षेप

अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आवश्यक स्वच्छता नियमांचे पालन होत नसल्याचे FDAच्या तपासणीत आढळलं. आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षा किट्सचा वापर केला जात नसल्याचेही प्रशासनाने नमूद केले. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छता राखणे, कच्चे व तयार पदार्थ वेगळे ठेवणे आणि अन्न हाताळताना आवश्यक सुरक्षा उपाय करणे हे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

परवाना निलंबित

एफडीएच्या मते, तपासणीत आढळलेल्या गंभीर अन्नसुरक्षा आणि स्वच्छता त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे कयानी एण्डचा थेट एफएसएसआय परवानाच तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. तसेच आस्थापनाला अन्नपदार्थांची खरेदी, उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विक्री आणि वितरण तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील कारवाई आणि आस्थापनाकडून त्रुटी दूर करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रशासनाच्या तपासणीनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    २९ सप्टेंबरला मुंबईत वादळ! उपवर्गीकरणासाठी ५ लाख मातंग समाजबांधव मुंबईत धडकणार; पोलीस व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सतर्क

    अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची (अ, ब, क, ड) मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित राहिल्याने मातंग समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. आपल्या हक्काच्या लढ्यासाठी मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी राज्यभरातून सुमारे पाच लाख समाजबांधव…

    विनोद कांबळींचा वृद्धाश्रमातील व्हिडिओमागचं सत्य अखेर समोर! वृद्धाश्रमाच्या संस्थापकांनी सांगितलं कारण, म्हणाले “आता त्याची पत्नी….”

    भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा वृद्धाश्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विनोद कांबळी या व्हिडिओमध्ये वृद्धाश्रमाबद्दल बोलताना दिसत आहे. कांबळीला अशा अवस्थेत पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांनी…

    Leave a Reply

    You Missed

    अस्वच्छतेचा कहर! किचनमध्ये झुरळे, उंदरांची विष्ठा अन् रक्ताने भरलेला फ्रीज; मुंबईतील ‘या’प्रसिद्ध हॉटेलवर एफडीएची मोठी कारवाई, थेट परवाना निलंबित

    अस्वच्छतेचा कहर! किचनमध्ये झुरळे, उंदरांची विष्ठा अन् रक्ताने भरलेला फ्रीज; मुंबईतील ‘या’प्रसिद्ध हॉटेलवर एफडीएची मोठी कारवाई, थेट परवाना निलंबित

    २ ऑक्टोबरला यूपीआय बंद राहणार? कोणत्याही खरेदीसाठी कॅश सोबत ठेवावी लागणार; पण हे सत्य की अफवा? ग्राहकांसाठी मोठी बातमी

    २ ऑक्टोबरला यूपीआय बंद राहणार? कोणत्याही खरेदीसाठी कॅश सोबत ठेवावी लागणार; पण हे सत्य की अफवा? ग्राहकांसाठी मोठी बातमी

    २९ सप्टेंबरला मुंबईत वादळ! उपवर्गीकरणासाठी ५ लाख मातंग समाजबांधव मुंबईत धडकणार; पोलीस व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सतर्क

    २९ सप्टेंबरला मुंबईत वादळ! उपवर्गीकरणासाठी ५ लाख मातंग समाजबांधव मुंबईत धडकणार; पोलीस व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सतर्क

    विनोद कांबळींचा वृद्धाश्रमातील व्हिडिओमागचं सत्य अखेर समोर! वृद्धाश्रमाच्या संस्थापकांनी सांगितलं कारण, म्हणाले “आता त्याची पत्नी….”

    विनोद कांबळींचा वृद्धाश्रमातील व्हिडिओमागचं सत्य अखेर समोर! वृद्धाश्रमाच्या संस्थापकांनी सांगितलं कारण, म्हणाले “आता त्याची पत्नी….”

    मढची निसर्गरम्य ओळख धोक्यात? अवैध दारू आणि अमली पदार्थांच्या विक्रीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप, प्रशासनाकडून कठोर कारवाईची अपेक्षा

    मढची निसर्गरम्य ओळख धोक्यात? अवैध दारू आणि अमली पदार्थांच्या विक्रीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप, प्रशासनाकडून कठोर कारवाईची अपेक्षा

    ‘दि प्राइड इंडिया’ आणि ‘महानगर गॅस’तर्फे श्रीवर्धनमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न; स्वरा कांबळे ठरली प्रथम विजेती

    ‘दि प्राइड इंडिया’ आणि ‘महानगर गॅस’तर्फे श्रीवर्धनमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न; स्वरा कांबळे ठरली प्रथम विजेती

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना! शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च शिवसेना उचलणार; उपमुख्यमंञी शिंदेंनी दिला थेट शब्द

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना! शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च शिवसेना उचलणार; उपमुख्यमंञी शिंदेंनी दिला थेट शब्द

    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने अपघात; कार थेट कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने अपघात; कार थेट कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    SIR च्या मुद्द्यावर ठाकरे बंधूं पुन्हा एकञ; ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार भव्य ‘जनमोर्चा’, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

    SIR च्या मुद्द्यावर ठाकरे बंधूं पुन्हा एकञ; ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार भव्य ‘जनमोर्चा’, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत