३५० तरुणांची लग्ने खोळंबली! पाणी ८०० मीटर अंतरावर असूनही गाव कोरडंच; अखेर गावकऱ्यांनी थेट गावचं विकायला काढलं,माढा तालुक्यातील तुळशी गावाची विदारक वास्तव

स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटूनही जर आम्हाला पिण्यासाठी अन् शेतीसाठी हक्काचं पाणी मिळत नसेल, ज्या देशात पाणी हे जीवन मानलं जातं, तिथे एका संपूर्ण गावाला आपल्या हक्काच्या पाण्यासाठी स्वतःचं गाव विकायला काढायची वेळ यावी? ही कोणत्याही चिञपटाची कथा नाहीये तर खरोखरंच हे घडतंय़.सोलापूरच्या माढा तालुक्यातील तुळशी गावात.

पाण्याची वणवण, ‘हे गाव विकणे आहे; किंमत फक्त पाणी’  थेट बोर्ड

गावात पाण्याचा टिपूस मिळवण्यासाठी वनवण भटकावं लागतंय. गावच्या अवघ्या ८०० मीटर अंतरावरून सीना-माढा उपसा सिंचन योजनेचा कालवा गेला आहे. मात्र, अवघ्या काही अंतरावर पाणी असूनही या गावाचा सीना-माढा योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या नाकर्तेपणाला कंटाळून संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या वेशीवरच टांगला एक भयंकर फलक- ‘हे गाव विकणे आहे; किंमत फक्त पाणी’ सोलापूरच्या लाल फितीत अडकलेल्या या तुळशी गावाची ही कहाणी नक्कीच डोळ्यांत पाणी आणणारी.

पाण्याअभावी तरुणांची लग्ने जमेनात

अवघ्या आठशे मीटर अंतरावरून कालवा वाहतोय, पण गावातल्या विहिरी कोरड्या ठाक पडल्यात. तीव्र पाणीटंचाईचा परिणाम केवळ शेती आणि जनावरांवरच झालेला नाही, तर गावकऱ्यांच्या कौटुंबिक आयुष्यावरही याचा भीषण परिणाम झाला आहे. पाण्याची शाश्वत सोय नसल्याने गावातील मुलांची लग्न खोळंबली आहेत. गावातील पाण्याची टंचाईची ही भीषणता पाहून ‘या गावात मुलगी देणार नाही’ असा मुलांना थेट नकार मिळतोय.त्यामुळे गावातील अनेक तरुणांचे लग्नाचे वय उलटूनही लग्न झालेली नाहीये. “ज्या गावात पाणीच नाही, तिथे मुलगी देऊन तिच्या आयुष्याचं वाटोळं का करायचं?” असा सवाल नातेवाईकांकडून केला जातो

सोलापूर जिल्हा प्रशासन खडबडून जागे

२५ वर्षे निवेदने, उपोषणे करून थकलेल्या तुळशीकरांनी जेव्हा ‘गाव विक्री’चा फलक लावला. या अनोख्या आंदोलनाची राज्यभरात जोरदार चर्चा झाल्यानंतर आणि बातमी प्रसिद्ध होताच सोलापूर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः धाव घ्यावी लागली.जिल्हाधिकाऱ्यांनी चावडीवरील तो ‘गाव विक्रीचा’ फलक खाली उतरवला. दर १० दिवसांनी या कामाच्या प्रगतीचा आढावा ग्रामस्थांना दिला जाईल असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर तुळशी ग्रामस्थांनी आपले १६ दिवसांचे आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे. मात्र, जर पुन्हा एकदा आश्वासनांचीच खैरात झाली आणि प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही, तर यापेक्षाही तीव्र आणि उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सरपंच आणि तुळशीच्या गावकऱ्यांनी दिला आहे.

पाण्याचा वनवास खरोखर संपणार? 

पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या ७ हजार तुळशीकरांच्या या अनोख्या आंदोलनाने थेट मंत्रालयापर्यंतचे धाबे दणाणले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन ‘गाव विकू देणार नाही’ असा शब्द तर दिलाय, त्यामुऴे पुन्हा गावकऱ्यांना दिलेला शब्द फक्त आश्वासन ठरणार की खरंच २५ वर्षांचा हा पाण्याचा वनवास खरोखर संपणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी cjp चे मुंबईत जोरदार आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारने शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नव्हती. तेव्हा अशा परिस्थितीत, सीजेपीने शिवाजी पार्कच्या बाहेर…

    मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

    कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली आज २ ऑक्टोबर २०२६ गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन आयोजित करण्यात…

    Leave a Reply

    You Missed

    पाकिस्तानला हरवत भारताचा Asian Games क्रिकेटमध्ये सलग दुसरा Gold;अभिषेक-तिलकचे वादळ अन् भारतीय गोलंदाजांची धार

    पाकिस्तानला हरवत भारताचा Asian Games क्रिकेटमध्ये सलग दुसरा Gold;अभिषेक-तिलकचे वादळ अन् भारतीय गोलंदाजांची धार

    ३५० तरुणांची लग्ने खोळंबली! पाणी ८०० मीटर अंतरावर असूनही गाव कोरडंच; अखेर गावकऱ्यांनी थेट गावचं विकायला काढलं,माढा तालुक्यातील तुळशी गावाची विदारक वास्तव

    ३५० तरुणांची लग्ने खोळंबली! पाणी ८०० मीटर अंतरावर असूनही गाव कोरडंच; अखेर गावकऱ्यांनी थेट गावचं विकायला काढलं,माढा तालुक्यातील तुळशी गावाची विदारक वास्तव

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

    मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

    महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही

    महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर