थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा! ज्ञानेश कुरामांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त एल्गार;हजारो कार्यकर्ते आणि तरुणांची गर्दी

अगदीच थोड्याच वेळातशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ची सुरुवात होणार आहे.

मोर्चा मेट्रो सिनेमापासून निघून मुंबई महापालिका (BMC) इमारतीसमोर धडकणार

सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून, १० वाजल्यापासून कार्यकर्ते व नागरिक जमा झाले आहेत. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून निघून मुंबई महापालिका (BMC) इमारतीसमोर धडकणार आणि नंतर त्याचे सभेत रूपांतर होणार आहे. विशेषत: या आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा असणार नाही, तर सहभागी नागरिकांना हातात केवळ तिरंगा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकशाही व संविधान रक्षणासाठी हा संयुक्त एल्गार पुकारण्यात आला आहे.

सर्वांच्या नजरा खिळल्या

केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज महामोर्चा निघणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांच्याकडून हा मोर्चा काढण्यात येणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय गर्जना करणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मुंबईच्या मेट्रो परिसरात शिवसैनिक गावाखेड्यातून दाखल होण्यास सुरूवात झाली.

राज ठाकरे हे भावी मुख्यमंत्री तर उद्धव ठाकरे हे भावी पंतप्रधान व्हावेत, …थेट बॅनर 

एवढंच नाही तर राज ठाकरे हे भावी मुख्यमंत्री तर उद्धव ठाकरे हे भावी पंतप्रधान व्हावेत, मनसे शिवसेनेत विलीन करावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. तेस बॅनरही त्यांनी लावले. दरम्यान मुंबई पोलिसांच्या विनंतीनुसार मोर्च्याच्या मार्गात बदल करण्यात आला असून, हा मोर्चा आता ‘मेट्रो सिनेमा’ ते ‘बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय’ असा निघणार आहे तसेच याआधी भायखळा ते आझाद मैदान असा मार्ग ठरला होता.तसेच या मोर्चाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जनमोर्चाची हाक दिली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा एकञ आवाज उठवणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मोर्चाकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    “सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच,हिंदू-मुस्लिम राजकारण,मग मोदी आमचे मिञ कसे?” शिवाजी पार्कमधील Gen Z तरुणीचा संताप; व्हिडिओ व्हायरल

    मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर २ ऑक्टोबरच्या दिवशी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ च्या वतीने आयोजित आंदोलनात तरुणांचा प्रचंड मोठा जनसागर पाहायला मिळाला. या…

    ३५० तरुणांची लग्ने खोळंबली! पाणी ८०० मीटर अंतरावर असूनही गाव कोरडंच; अखेर गावकऱ्यांनी थेट गावचं विकायला काढलं,माढा तालुक्यातील तुळशी गावाची विदारक वास्तव

    स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटूनही जर आम्हाला पिण्यासाठी अन् शेतीसाठी हक्काचं पाणी मिळत नसेल, ज्या देशात पाणी हे जीवन मानलं जातं, तिथे एका संपूर्ण गावाला आपल्या हक्काच्या पाण्यासाठी स्वतःचं गाव विकायला…

    Leave a Reply

    You Missed

    थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा! ज्ञानेश कुरामांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त एल्गार;हजारो कार्यकर्ते आणि तरुणांची गर्दी

    थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा! ज्ञानेश कुरामांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त एल्गार;हजारो कार्यकर्ते आणि तरुणांची गर्दी

    “सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच,हिंदू-मुस्लिम राजकारण,मग मोदी आमचे मिञ कसे?” शिवाजी पार्कमधील Gen Z तरुणीचा संताप; व्हिडिओ व्हायरल

    “सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच,हिंदू-मुस्लिम राजकारण,मग मोदी आमचे मिञ कसे?” शिवाजी पार्कमधील Gen Z तरुणीचा संताप; व्हिडिओ व्हायरल

    पाकिस्तानला हरवत भारताचा Asian Games क्रिकेटमध्ये सलग दुसरा Gold;अभिषेक-तिलकचे वादळ अन् भारतीय गोलंदाजांची धार

    पाकिस्तानला हरवत भारताचा Asian Games क्रिकेटमध्ये सलग दुसरा Gold;अभिषेक-तिलकचे वादळ अन् भारतीय गोलंदाजांची धार

    ३५० तरुणांची लग्ने खोळंबली! पाणी ८०० मीटर अंतरावर असूनही गाव कोरडंच; अखेर गावकऱ्यांनी थेट गावचं विकायला काढलं,माढा तालुक्यातील तुळशी गावाची विदारक वास्तव

    ३५० तरुणांची लग्ने खोळंबली! पाणी ८०० मीटर अंतरावर असूनही गाव कोरडंच; अखेर गावकऱ्यांनी थेट गावचं विकायला काढलं,माढा तालुक्यातील तुळशी गावाची विदारक वास्तव

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

    मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

    महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही

    महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर