नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार असाल तर त्याआधी ही माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी वाढत असते. त्याच पार्श्वभूमीवर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने VIP दर्शनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिरातील सर्व प्रकारची VIP दर्शन सुविधा १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
3 ते 12 ऑक्टोबरपर्यंत VIP दर्शन बंद
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबरपासूनच हा निर्णय लागू करण्यात आला आहे. ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मंदिरातील VIP दर्शन व्यवस्था बंद राहणार आहे. पितृपक्षाच्या काळात त्र्यंबकेश्वरमध्ये देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. कारण पितृपक्षात त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधी आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत असते. त्यामुळे मंदिरातील सर्वसामान्य दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी VIP दर्शन तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी निर्णय
पितृपक्ष हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा काळ मानला जातो. या कालावधीत पूर्वजांच्या स्मरणार्थ विविध धार्मिक विधी करण्यासाठी भाविक त्र्यंबकेश्वरला येतात. त्यामुळे मंदिर परिसर तसेच शहरातील विविध भागांत भाविकांची वर्दळ असते. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सर्व भाविकांना शक्य तितक्या सुरळीतपणे दर्शन घेता यावं यासाठी देवस्थान ट्रस्टकडून नियोजन करण्यात येत आहे. म्हणून VIP दर्शन सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व भाविकांना समान आणि सुरळीत दर्शनाचा अनुभव मिळावा, तसेच मंदिरातील गर्दीचे योग्य व्यवस्थापन करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
भाविकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने सर्व भाविकांना VIP दर्शन बंद ठेवण्याच्या निर्णयाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मंदिर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.त्यामुळे ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्याचा विचार करणाऱ्या भाविकांनी दर्शनाचे नियोजन करताना ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. विशेषतः VIP दर्शनाची अपेक्षा असलेल्या भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असही मंदीर ट्रस्टने सांगितलं आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य दर्शन व्यवस्था अधिक सुरळीत ठेवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.








