ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

ओला आणि उबरसारखी आता ॲम्ब्युलन्सही अवघ्या काही सेकंदांत मोबाईलवरून बुक होणार. वैद्यकीय आणीबाणीत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणतंय एक मोठं डिजिटल ॲप असणार आहे. अचानक उद्भवलेली वैद्यकीय आणीबाणी किंवा रस्त्यावरील भीषण अपघात असो रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ॲम्ब्युलन्स मिळवणे हे नातेवाईकांसाठी मोठे आव्हान ठरते. ओला-उबरसारख्या कॅब ज्याप्रमाणे आपण काही सेकंदात बुक करतो, अगदी त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रात रुग्णवाहिका बुक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारचा परिवहन विभाग लवकरच रुग्णवाहिका सेवेसाठी एक विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मोबाईल ॲप लाँच करण्याच्या तयारीत आहे.

या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नागरिकांना मोबाईल ॲप किंवा वेबसाइटवरून त्यांच्या परिसरातील सर्वात जवळची आणि उपलब्ध रुग्णवाहिका शोधता येईल. या निर्णयामुळे ऐनवेळी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

ॲपवर काय-काय असणार खास?

लाईव्ह लोकेशन : रुग्णवाहिका सध्या कुठे आहे आणि ती किती वेळात पोहोचेल याची अचूक माहिती स्क्रीनवर दिसेल.

सेवा शुल्क : ॲम्ब्युलन्स बुक करण्यापूर्वीच तिचे सेवा शुल्क किती असेल, हे आधीच स्पष्ट दिसेल.

पारदर्शकता : रुग्णाच्या नातेवाईकांना बुकिंग करण्यापूर्वी सर्व आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.

RTO कडे नोंदणीकृत सर्व ॲम्ब्युलन्स जोडल्या जाणार

राज्यातील विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये नोंदणीकृत असलेल्या रुग्णवाहिकांची संपूर्ण माहिती या डिजिटल प्रणालीशी जोडली जाणार आहे. यासाठी परिवहन विभाग आरोग्य विभागाच्या समन्वयाने काम करत आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या रुग्णवाहिकांसह खासगी ॲम्ब्युलन्स चालकांनाही सहभागी करून घेण्याचा विचार आहे. तसेच खासगी रुग्णवाहिका चालकांसाठी या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे अनिवार्य केले जाण्याची शक्यता आहे. या प्रणालीत नोंदणीकृत होणाऱ्या प्रत्येक रुग्णवाहिकेत काही किमान वैद्यकीय सोयी-सुविधा असणे बंधनकारक केले जाऊ शकते.

‘गोल्डन अवर’मध्ये वाचणार रुग्णांचे प्राण

रस्ते अपघातांच्या घटनेनंतरचा पहिला तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ अत्यंत संवेदनशील मानला जातो. या वेळेत गंभीर जखमी रुग्णाला योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. म्हणूनच आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्याचा वेळ कमी करून तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

फोन कॉलच्या त्रासातून होणार सुटका

सध्या नागरिकांना ॲम्ब्युलन्स मिळवण्यासाठी आपत्कालीन हेल्पलाइन किंवा स्थानिक खासगी चालकांशी संपर्क साधावा लागतो. यासाठी एकापाठोपाठ एक अनेक फोन कॉल्स करावे लागतात. प्रस्तावित प्लॅटफॉर्ममुळे ही संपूर्ण प्रक्रिया एकाच डिजिटल इंटरफेसवर सोपी होईल.

याशिवाय, प्रवासादरम्यान प्राथमिक वैद्यकीय मदत देऊ शकतील अशा रुग्णवाहिकांचा यात समावेश केला जाईल. काही विशेष सेवांमध्ये डॉक्टर किंवा नर्स उपलब्ध करून देण्याबाबतही विचार सुरू आहे. सध्या हा प्रस्ताव नियोजनाच्या टप्प्यावर असून, सविस्तर नियमावली तयार झाल्यानंतरच या प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    लातूर-मुरूड महामार्गावर बोरगाव काळे नजीक मंगळवारी रात्री एक अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणारा अपघात घडला आहे. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला,…

    २ ऑक्टोबरला यूपीआय बंद राहणार? कोणत्याही खरेदीसाठी कॅश सोबत ठेवावी लागणार; पण हे सत्य की अफवा? ग्राहकांसाठी मोठी बातमी

    २ ऑक्टोबरला काही खेरदीसाठी बाहेर पडणार असाल तर कॅश घेऊन जा कारण त्यादिवशी असणार आहे ‘नो यूपीआय डे’ म्हणजे तुम्ही UPI द्वारे पेमेंट करू शकणार नाही. असंच ऐकलं किंवा पाहिलं…

    Leave a Reply

    You Missed

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ऐन सणासुदीत सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं! दिवाळीच्या आधी साखरेचे भाव १७ टक्क्यांनी वाढले, किंमत ऐकून धक्का बसेल

    ऐन सणासुदीत सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं! दिवाळीच्या आधी साखरेचे भाव १७ टक्क्यांनी वाढले, किंमत ऐकून धक्का बसेल

    मढच्या रहेजा ओशन एक्सोटिका बांधकामाला BMC कडून ‘स्टॉप वर्क नोटीस’; आमदार असलम शेख यांच्या हस्तक्षेपानंतर मोठी कारवाई!

    मढच्या रहेजा ओशन एक्सोटिका बांधकामाला BMC कडून ‘स्टॉप वर्क नोटीस’; आमदार असलम शेख यांच्या हस्तक्षेपानंतर मोठी कारवाई!

    ठाकरे बंधूंवर गुन्हा दाखल! दादरच्या शिवाजी पार्कवरील हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई, बेकायदा जमाव जमवल्याचा ठपका

    ठाकरे बंधूंवर गुन्हा दाखल! दादरच्या शिवाजी पार्कवरील हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई, बेकायदा जमाव जमवल्याचा ठपका

    शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तर ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

    शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तर ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

    मालाड पश्चिमेत बस अपघात! तरुण बसच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू

    मालाड पश्चिमेत बस अपघात!  तरुण बसच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू

    MPSC विद्यार्थ्यांचा मोठा विजय! MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, शिपायापासून सर्व अध्यक्षांपर्यंत चौकशी;विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बसून रोहित पवारांचा जल्लोष

    MPSC विद्यार्थ्यांचा मोठा विजय! MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, शिपायापासून सर्व अध्यक्षांपर्यंत चौकशी;विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बसून रोहित पवारांचा जल्लोष

    दिल्लीनंतर आता मुंबई पेटली! शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; पोलीस थेट सेना भवनाच्या परिसरात, आदित्य ठाकरेंचा पोलीस व्हॅनवर चढून निषेध

    दिल्लीनंतर आता मुंबई पेटली! शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; पोलीस थेट सेना भवनाच्या परिसरात,  आदित्य ठाकरेंचा पोलीस व्हॅनवर चढून निषेध

    “आदेश देऊनही मेट्रो अन् इंटरनेट का रोखले?,लोकांच्या हालचालींवर अडथळा आणू नका” CJP आंदोलनावरील कारवाईवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक, केंद्र सरकारला फटकारले

    “आदेश देऊनही मेट्रो अन् इंटरनेट का रोखले?,लोकांच्या हालचालींवर अडथळा आणू नका”  CJP आंदोलनावरील कारवाईवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक, केंद्र सरकारला फटकारले