पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

लातूर-मुरूड महामार्गावर बोरगाव काळे नजीक मंगळवारी रात्री एक अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणारा अपघात घडला आहे. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

काळीज पिळवटून टाकणारा अपघात

बोरगाव काळे मुरूडकडून लातूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने मोटारसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला असून यात एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (२९ सप्टेंबर) रात्री ७ वाजण्याच्या सुमारास बोरगाव काळे येथील पेट्रोल पंपाजवळ घडला.

एक ठार, दोन जण गंभीर जखमी

या भीषण अपघातामध्ये महादेव भाऊसाहेब पांचाळ (वय २६, रा. रामेगाव ता. जि. लातूर) या तरुणाचा लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शाम दयानंद पांचाळ (वय २०) आणि शशिपाल शिवाजी काशीकर (वय १९, दोघेही रा. रामेगाव) हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मुरुड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

दुचाकीचा पूर्णत: चक्काचूर झाला

पाेलिसांनी सांगितले, मुरूड येथून लातूरकडे जाणारी कार (जी.जे. ०५ जे.एस. ८५१४) आणि पेट्रोल पंपावर कामासाठी येणाऱ्या तिघांची दुचाकी (एम.एच. १४ जी.पी. ६९२६) यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला.मिळालेल्या माहितीनुसार, शाम पांचाळ आणि शशिपाल काशीकर हे दोघे बोरगाव काळे येथील पेट्रोल पंपावर रात्रीच्या ड्यूटीसाठी जात होते. त्यांना सोडण्यासाठी महादेव पांचाळ हा आपल्या मोटारसायकलवरून (क्रमांक: MH 14 GP 6926) सोबत आला होता. पेट्रोल पंप अवघ्या हाकेच्या अंतरावर असतानाच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्रमांक: GJ 05 JS 8514) दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीचा पूर्णत: चक्काचूर झाला, तर कारच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले.

तीन-चार महिन्यांपूर्वीच झाले होते महादेव पांचाळचे लग्न…

बोरगाव काळे नजीकच्या पेट्रोलपंपावर कामासाठी आलेल्या दोन मित्रांना सोडण्यास महादेव पांचाळ हा तरुण निघाला हाेता. पेट्रोलपंप अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला. महादेव पांचाळ याचे तीन-चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अंगावरची हळदही निघाली नव्हती, अशातच त्याला अपघाती मृत्यूने गाठले. या अपघाताने पांचाळ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

उपचारादरम्यान महादेव पांचाळ यांची प्राणज्योत मालवली

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिन्ही जखमींना मुरूड येथील चांडक रुग्णालयात दाखल केले. मात्र, सर्वांचीच प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णवाहिकेने लातूर येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान महादेव पांचाळ यांची प्राणज्योत मालवली.

३-४ महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न; रामेगाववर शोकाकुल कळा

मृत महादेव पांचाळ याचे अवघ्या ३ ते ४ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अंगावरची हळदही नीट वाळली नसतानाच काळाने त्याच्यावर असा अचानक घाला घातल्याने रामेगाव परिसरावर आणि पांचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मित्रांना सोडण्यासाठी निघालेल्या महादेवचा असा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  घटनास्थळी मुरूड पोलीस ठाण्याच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली असून, या अपघाताबाबत पोलिसांत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    २ ऑक्टोबरला यूपीआय बंद राहणार? कोणत्याही खरेदीसाठी कॅश सोबत ठेवावी लागणार; पण हे सत्य की अफवा? ग्राहकांसाठी मोठी बातमी

    २ ऑक्टोबरला काही खेरदीसाठी बाहेर पडणार असाल तर कॅश घेऊन जा कारण त्यादिवशी असणार आहे ‘नो यूपीआय डे’ म्हणजे तुम्ही UPI द्वारे पेमेंट करू शकणार नाही. असंच ऐकलं किंवा पाहिलं…

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    देशात सध्या ८०च्या दशकातील (1980s) ट्रेंड पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘80s AI Photo Trend’ तसेच त्या काळातील फॅशन आणि पॉप कल्चरशी संबंधित…

    Leave a Reply

    You Missed

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुखाची हत्या; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या,हत्येमागे राजकीय कट?

    ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुखाची हत्या; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या,हत्येमागे राजकीय कट?

    १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती, ७७ हजार कोटींचे नुकसान!महायुतीवर गंभीर आरोप; रोहित पवारांनी आकडेवारीसह केला पोलखोल,तर पत्रकार परिषदेत थेट शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल

    १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती, ७७ हजार कोटींचे नुकसान!महायुतीवर गंभीर आरोप; रोहित पवारांनी आकडेवारीसह केला पोलखोल,तर पत्रकार परिषदेत थेट शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल

    वाहनचालकांना मोठा झटका! थकीत ई-चलानची रक्कम आता थेट वीजबिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा प्रस्ताव

    वाहनचालकांना मोठा झटका! थकीत ई-चलानची रक्कम आता थेट वीजबिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा प्रस्ताव

    अस्वच्छतेचा कहर! किचनमध्ये झुरळे, उंदरांची विष्ठा अन् रक्ताने भरलेला फ्रीज; मुंबईतील ‘या’प्रसिद्ध हॉटेलवर एफडीएची मोठी कारवाई, थेट परवाना निलंबित

    अस्वच्छतेचा कहर! किचनमध्ये झुरळे, उंदरांची विष्ठा अन् रक्ताने भरलेला फ्रीज; मुंबईतील ‘या’प्रसिद्ध हॉटेलवर एफडीएची मोठी कारवाई, थेट परवाना निलंबित

    २ ऑक्टोबरला यूपीआय बंद राहणार? कोणत्याही खरेदीसाठी कॅश सोबत ठेवावी लागणार; पण हे सत्य की अफवा? ग्राहकांसाठी मोठी बातमी

    २ ऑक्टोबरला यूपीआय बंद राहणार? कोणत्याही खरेदीसाठी कॅश सोबत ठेवावी लागणार; पण हे सत्य की अफवा? ग्राहकांसाठी मोठी बातमी

    २९ सप्टेंबरला मुंबईत वादळ! उपवर्गीकरणासाठी ५ लाख मातंग समाजबांधव मुंबईत धडकणार; पोलीस व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सतर्क

    २९ सप्टेंबरला मुंबईत वादळ! उपवर्गीकरणासाठी ५ लाख मातंग समाजबांधव मुंबईत धडकणार; पोलीस व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सतर्क

    विनोद कांबळींचा वृद्धाश्रमातील व्हिडिओमागचं सत्य अखेर समोर! वृद्धाश्रमाच्या संस्थापकांनी सांगितलं कारण, म्हणाले “आता त्याची पत्नी….”

    विनोद कांबळींचा वृद्धाश्रमातील व्हिडिओमागचं सत्य अखेर समोर! वृद्धाश्रमाच्या संस्थापकांनी सांगितलं कारण, म्हणाले “आता त्याची पत्नी….”