मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

तुम्हीेदेखील आज मुंबईत गाडी घेऊन प्रवेश करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. किंबहूना मुंबईकरांसाठी ही बातमी खर्चात आणि चिंतेत टाकणारी आहे.ऑक्टोबरच्या पहिल्याच तारखेपासून मुंबईकरांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसला आहे. कारण १ ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणे अधिक महाग झाले आहे.

उड्डाणपुलांची वसुली मुंबईकरांच्या खिशातून

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबईच्या प्रवेशद्वारांवर असणाऱया पाचही टोल नाक्यांवरील पथकर दरात वाढ करण्यात आली आहे.  मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांची वसुली अजूनही कायम असून, या वसुलीचा नवा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. याचाच अर्थ मुंबईतील ५५ उड्डाणपुलांचा खर्च वसूल करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ५ मुख्य टोलनाक्यांवर आता महामंडळाने हा दरवाढीचा चाबूक चालवला आहे. गेल्या वर्षी हलक्या वाहनांना टोलमाफी देऊन मोठा दिलासा मिळाला असला, तरी आता मिनी बस, ट्रक आणि अवजड वाहनांना १५ ते ३५ रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

कोणत्या वाहनांना किती टोल

नव्या नियमानुसार, वाहनधारकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. मिनी बस, एल. सी. व्ही. वाहनांना ७५ रुपयांऐवजी ९० रुपये आकारले जाणार आहे. अवजड वाहनांना देखील अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. ट्रक बस सारख्या वाहनांना १५० रुपयांहून थेट १८० रुपये मोजावे लागतील. तर अवजड १९० रुपयांऐवजी २२५ रुपये इतके मोजावे लागतील. नव्या दरांनुसार, एल.सी.व्ही वाहनाच्या दरात १५ रुपयांनी वाढ झाल्याचे समोर आलं आहे. तर ट्रक, बसच्या दरात ३५ रुपयांनी वाढ झालीये. त्यामुळे मुंबईच्या एन्ट्री प्रवेशावरील प्रवास आजपासून महागणार आहे.

ही वसुली २०२७ पर्यंत सुरू राहणार

दरम्यान या उड्डाणपुलाचा खर्च वसूल करण्यासाठी वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर अशा टोलच्या नाक्याची उभारणी करण्यात आली आहे. ही वसुली २०२७ पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मिळत आहे. सरकारने ऑक्टोबर २०२४ पासून हलके वाहन, बेस्ट बस, एसटी आणि शालेय वाहनांना टोल माफ करण्यात आला आहे. या निर्णयाने अनेकांना दिलासा मिळाला. परंतु मिनी बस, एल. सी. व्ही. वाहने, ट्रक, बस आणि अवजड वाहनांना पथकर लागू करण्यात आला आहे. तर तीन वर्षांनी टोल नाक्याच्या दरात एमएसआरडीसीकडून टोलची वाढ केली आहे.

अतिरिक्त खर्चाचा भार लादला

ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्य सरकारने कार आणि एसटी गाड्यांना टोलमुक्त करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. मात्र, दर तीन वर्षांनी होणाऱ्या दरवाढीच्या नियमावर बोट ठेवत MSRDC ने व्यावसायिक वाहनांवर पुन्हा एकदा अतिरिक्त खर्चाचा भार लादला आहे. २०२७ पर्यंत चालणाऱ्या या टोल वसुलीमुळे आता महागाई आणि मालवाहतुकीचा खर्च वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टोलची दरवाढ ही २०२३ साली झाली होती. त्यानंतर तीन वर्षांनंतर एमएसआरडीसीकडून पुन्हा टोलच्या दरात मोठी वाढ केली आहे. याविषयी बुधवारी सूचना प्रसिद्ध करण्यात आली. नवीन टोल दर आज म्हणजेच १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांचा खिशाला काञी लागली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

    मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील गोराई-मनोरी किनाऱ्याजवळ गेल्या चार महिन्यांपासून अडकलेल्या एका मोठ्या जहाजावर धक्कादायक घटना घडली आहे. या जहाजातून तब्बल चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. शिपवर चोरी करण्याचा प्रयत्न…

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अंधेरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुलाच्या सुरक्षेवरून आणि देखभालीवरून आधीच विविध प्राधिकरणांमध्ये वाद सुरू असताना, अंधेरी उड्डाणपुलाच्या देखभालीचं काम…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुखाची हत्या; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या,हत्येमागे राजकीय कट?

    ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुखाची हत्या; कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या,हत्येमागे राजकीय कट?

    १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती, ७७ हजार कोटींचे नुकसान!महायुतीवर गंभीर आरोप; रोहित पवारांनी आकडेवारीसह केला पोलखोल,तर पत्रकार परिषदेत थेट शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल

    १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती, ७७ हजार कोटींचे नुकसान!महायुतीवर गंभीर आरोप; रोहित पवारांनी आकडेवारीसह केला पोलखोल,तर पत्रकार परिषदेत थेट शेतकऱ्याला व्हिडिओ कॉल

    वाहनचालकांना मोठा झटका! थकीत ई-चलानची रक्कम आता थेट वीजबिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा प्रस्ताव

    वाहनचालकांना मोठा झटका! थकीत ई-चलानची रक्कम आता थेट वीजबिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा प्रस्ताव

    अस्वच्छतेचा कहर! किचनमध्ये झुरळे, उंदरांची विष्ठा अन् रक्ताने भरलेला फ्रीज; मुंबईतील ‘या’प्रसिद्ध हॉटेलवर एफडीएची मोठी कारवाई, थेट परवाना निलंबित

    अस्वच्छतेचा कहर! किचनमध्ये झुरळे, उंदरांची विष्ठा अन् रक्ताने भरलेला फ्रीज; मुंबईतील ‘या’प्रसिद्ध हॉटेलवर एफडीएची मोठी कारवाई, थेट परवाना निलंबित

    २ ऑक्टोबरला यूपीआय बंद राहणार? कोणत्याही खरेदीसाठी कॅश सोबत ठेवावी लागणार; पण हे सत्य की अफवा? ग्राहकांसाठी मोठी बातमी

    २ ऑक्टोबरला यूपीआय बंद राहणार? कोणत्याही खरेदीसाठी कॅश सोबत ठेवावी लागणार; पण हे सत्य की अफवा? ग्राहकांसाठी मोठी बातमी