मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने अंदमानात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशभरात मान्सूनचे आगमन वेगाने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या तीन ते चार दिवसांत दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र तसेच दक्षिण बंगालच्या उपसागरातही मान्सून पोहोचण्यास अनुकूल स्थिती आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात देखील मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये आजपासूनच पूर्वमान्सून पावसाला सुरुवात झाली असून, येत्या 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनचा पहिला टप्पा सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 105 टक्के पावसासह राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्येही यंदा चांगल्या प्रमाणात पावसाची नोंद होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

शेती, जलस्रोत व्यवस्थापन आणि नागरिकांच्या दृष्टीने ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आता सर्वांची नजर 6 जूनकडे लागली आहे, जेव्हा मान्सून महाराष्ट्रात अधिकृतपणे दाखल होईल.

  • Related Posts

    सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर! जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय, कोर्टाच्या लढाईनंतर मैदानात मारली बाजी

    सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. जत सोसायटी गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला आहे. पडळकर यांनी 54 मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवारावर २०…

    पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी! शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्यामुळे ऍडमिट, डॉक्टरांनी दिली माहिती

    पवार कुटुंबातून सध्याची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या…

    Leave a Reply

    You Missed

    सर्वोच्च न्यायालयाचा दणका! मुंबई महानगरपालिका आयुक्त आयुक्त अश्विनी भिडेंना ५ लाखांचा दंड, पगार रोखण्याचेही आदेश

    संघर्षाची वाट अखेरपर्यंत न सोडणारे पँथर आनंद (दादा) निकाळजे काळाच्या पडद्याआड; आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान योद्ध्याला श्रद्धानंजली

    संघर्षाची वाट अखेरपर्यंत न सोडणारे पँथर आनंद (दादा) निकाळजे काळाच्या पडद्याआड; आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान योद्ध्याला श्रद्धानंजली

    सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर! जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय, कोर्टाच्या लढाईनंतर मैदानात मारली बाजी

    सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर! जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय, कोर्टाच्या लढाईनंतर मैदानात मारली बाजी

    पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी! शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्यामुळे ऍडमिट, डॉक्टरांनी दिली माहिती

    पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी! शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्यामुळे ऍडमिट, डॉक्टरांनी दिली माहिती

    दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना महागाईचा दणका! टीव्ही, फ्रीजसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मिठाई महागली

    मुंबईत रंगली आंतरक्लब तायक्वांदो स्पर्धा! खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग, स्पीड किक अन् स्पॅरिंगने जिंकली मने

    महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा! प्रवासी गाढ झोपेत, रेल्वेवर दगडफेक अन् दरोडा घालत महिलांचे दागिने हिसकावले, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    ‘अर्नब’ चक्रीवादळाचा राज्यात प्रभाव कायम! विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता,दुष्काळ भागांसाठी दिलासा

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!