AXIS बँकेच्या खातेदाराची सायबर फसवणूक- ₹84,465 इतकी रक्कम डेबिट झाली ;ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या एका रहिवाशाची AXIS बँकेच्या नावाने सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. दिनांक 13 मे 2025 रोजी सकाळी 3:58 वाजता पीडित व्यक्तीला 7348096462 या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. कॉल करणाऱ्याने स्वत:ला AXIS बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून त्यांच्याकडून KYC (लयल्टी पॉइंट्स) अपडेटसाठी माहिती मागवली.

सदर व्यक्तीने सांगितलेल्या सूचनांनुसार, Cardsaxis.com या वेबसाइटवर लॉगिन करायला लावण्यात आले. त्यानंतर OTP मागवून खात्यातील रक्कम चुकवण्यात आली. यामध्ये पीडितांच्या AXIS बँकेच्या खात्यामधून ₹84,465 इतकी रक्कम डेबिट झाली.

घटनेनंतर पीडित व्यक्तीने तत्काळ AXIS बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून त्यांच्या क्रेडिट कार्ड संदर्भात माहिती दिली. यानंतर त्यांनी लोखंडवाला येथील AXIS बँकेच्या शाखेत जाऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे.

सदर फसवणूक AXIS बँकेच्या नावाने फेक वेबसाइट व बनावट कॉलद्वारे करण्यात आली आहे. संबंधित मोबाईल क्रमांक व वेबसाइट यांच्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहितीही मिळत आहे.

त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही बँकेचा फोन आल्यास वैयक्तिक माहिती, OTP, कार्ड क्रमांक यासारखी माहिती शेअर करू नये. बँका कधीच अशा प्रकारे माहिती मागवत नाहीत. कोणतीही शंका असल्यास अधिकृत बँक शाखेशी किंवा हेल्पलाइनशी संपर्क साधावा.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक वेसावा कोळीवाडा सध्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत…

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील श्रीक्षेत्र यशवाडी येथे आज मोठी दुर्घटना घडली आहे. हनुमान मंदिराच्या बांधकामादरम्यान दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास मंदिराचा काही भाग अचानक कोसळला. घटनेच्या वेळी मंदिर परिसरात भाविकांची…

    Leave a Reply

    You Missed

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द