मुख्यमंत्री फडणवीस यांचे बिहारमधील वक्तव्य वादात—‘छटपूजा पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करू’ या वक्तव्यावर सोशल मीडियावर ट्रोलिंग

मुंबई : एकीकडे मुंबईसारख्या महानगरात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, रेल्वे-बसमधील असह्य गर्दी, आणि वाहतूक कोंडी यामुळे मुंबईकर अक्षरशः हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने “राज्यातील रोजगार आणि जागा प्रथम स्थानिकांसाठी राखीव ठेवाव्यात” अशी ठाम मागणी केली आहे. तसेच बाहेरील राज्यांमधून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतराला त्यांनी विरोध दर्शविला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार दौऱ्यावर असताना केलेले वक्तव्य आता सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. बिहारमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले —

“या वर्षी बिहारमध्ये निवडणुका असल्याने आपण छटपूजा एकत्र साजरी करू शकत नाही, परंतु पुढील वर्षी आपण मुंबईत मोठ्या उत्सवात छटपूजा एकत्र साजरी करू.”

या विधानानंतर अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर फडणवीस यांच्यावर टीका करत संताप व्यक्त केला आहे. नागरिकांचा सवाल असा की —
“मुंबईतील वाढती लोकसंख्या, स्थानिक बेरोजगारी आणि सुविधा अभाव यावर सरकारचे लक्ष का नाही? बाहेरील मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न का केला जातोय?”

राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, या वक्तव्यामुळे ‘स्थानिक विरुद्ध बाहेरचे’ हा जुना मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू ठाणे,दि.१५ एप्रिल देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरात राबविण्यात…

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदगीरात राजकीय खळबळ; आमदार कार्यालयाबाहेर लघवी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

उदगीर शहरातील कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने लघवी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल लातूर / उदगीर महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात एक वादग्रस्त घटना…

Leave a Reply

You Missed

जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

  • By Admin
  • April 22, 2026
रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई