हसत-हसत https://jagrutmaharashtra.com/Article3841/राजकारणाचा आरसा : ‘ईशय गंभीर’मधील पोपटलाल ठरला टिटवाळ्याचा जनआवाज निवडणूक काळात हवा केली पोपटलालच्या ईशय गंभीरने…

‘ईशय गंभीर’मधील पोपटलाल ठरला टिटवाळ्याचा जनआवाज http://टिटवाळा

टिटवाळा : स्थानिक राजकारणात नेहमीच गंभीर चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळते. मात्र याच गंभीरतेला विनोद, विडंबन आणि बोचऱ्या वास्तवाची धार देत ‘ईशय गंभीर’ या सदरातून सोशल मिडीयाच्या माध्यमातून उभा राहिलेला पोपटलाल हा कॅरेक्टर सध्या टिटवाळा परिसरात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. स्थानिक घडामोडींवर हलक्याफुलक्या शैलीत, पण नेमक्या शब्दांत भाष्य करणाऱ्या पोपटलालने गेल्या काही दिवसांत नागरिकांच्या मनावर ठसा उमटवला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा विभागात उमेदवारांच्या चर्चा, राजकीय डावपेच आणि पडद्यामागील हालचालींना वेग आला असताना पोपटलालने या सगळ्यावर विडंबनात्मक भाष्य करत जनतेसमोर एक वेगळाच आरसा धरला. हसत-हसत, पण डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी त्याची शैली लोकांना भावली. स्थानिक राजकारणातील वेगाने घडणाऱ्या घडामोडींवर तितक्याच वेगाने सतत अपडेट देत , एखादी घडामोड घडल्यानंतर काही सेकंदातच त्याने केलेले परखड भाष्य केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता विचार करायला लावणारे ठरले.
गेल्या पंधरा दिवसांत पोपटलालची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. सोशल मीडियावर ‘ईशय गंभीर’ या सदरातील व्हिडिओ, पोस्ट आणि चर्चा मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून, नागरिकांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. राजकारणावर थेट टीका न करता, विनोदाच्या आडून वास्तव मांडण्याची पोपटलालची हातोटी लोकांना आवडत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेकदा थेट बोलण्यापेक्षा विडंबन जास्त प्रभावी ठरते, याचा प्रत्यय या पात्राने दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांकडून पोपटलालच्या भूमिकेचा आवाका वाढवावा, अशी मागणी होत आहे. केवळ राजकारणापुरतेच नव्हे तर समाजातील इतर ज्वलंत प्रश्न, सामान्य माणसाच्या अडचणी, व्यवस्था आणि प्रशासनातील त्रुटींवरही पोपटलालने भाष्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘ईशय गंभीर’ हे सदर सोशल मीडियावर नियमितपणे सुरू ठेवावे आणि त्यातून समाजप्रबोधनाची भूमिका अधिक ठळकपणे मांडावी, अशीही प्रतिक्रिया पुढे येत आहे.
हसत हसत वास्तव सांगणारा पोपटलाल सध्या टिटवाळ्याच्या स्थानिक चर्चांचा केंद्रबिंदू ठरला असून, राजकारणातील गंभीरतेला विडंबनाची धार देणारा हा प्रयोग पुढे कोणती दिशा घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सगळ्या चर्चेत आणखी एक रंजक बाब म्हणजे पोपटलालने काही स्थानिक राजकारण्यांना दिलेली विनोदी टोपणनावे. कुणावरही थेट टीका न करता, हसत-हसत ठेवलेली ही नावे इतकी नेमकी आणि बोलकी ठरली की तीच आता टिटवाळा परिसरात ओळखीची बनली आहेत. चौकाचौकांत, चहाच्या टपऱ्यांवर आणि सोशल मीडियावर ही नावे चर्चेचा विषय ठरत असून, मूळ नावांपेक्षा ही टोपणनावेच जास्त वापरली जात आहेत. विडंबनाच्या आडून व्यक्तिमत्त्व, भूमिका आणि राजकीय स्वभाव अधोरेखित करणारी ही शैली लोकांना भावली आहे. त्यामुळे राजकारणातील गंभीर चेहरे विनोदाच्या आरशात दिसू लागले असून, या नावांनीच संबंधितांची प्रतिमा लोकांच्या मनात ठसली आहे. हेच पोपटलालच्या भाष्याचे आणि ‘ईशय गंभीर’च्या प्रभावाचे मोठे यश मानले जात आहे.

या चर्चेच्या केंद्रस्थानी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो, तो म्हणजे पोपटलाल या पात्राच्या माध्यमातून ईशय गंभीर हे सदर चालवणारे टिटवाळ्याचे स्थानिक पत्रकार अजय शेलार हे गेली तब्बल पंचवीस वर्षे अजय शेलार आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने भाष्य करत आहेत. केवळ बातम्या देण्यापुरते न थांबता त्यांनी पत्रकारितेला जनसामान्यांचा आवाज बनवले आहे. दुर्लक्षित घटकांच्या समस्या, प्रशासनातील त्रुटी, अन्याय आणि विसंगती यांना त्यांनी आपल्या लेखनातून ठामपणे वाचा फोडली.
अजय शेलार यांच्या पत्रकारितेची ओळख ही निर्भीडपणा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी अशी आहे. लोकांच्या दैनंदिन अडचणी, नागरी प्रश्न, पायाभूत सुविधांचा अभाव असो वा स्थानिक पातळीवरील अन्यायकारक निर्णय—या सर्व विषयांना त्यांनी आपल्या लेखणीतून न्याय दिला. जनसामान्यांच्या वेदना आणि अपेक्षा शब्दांत उतरवत त्यांनी अनेक प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आणले आणि प्रशासनाला जागे करण्याचे काम केले.
पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या प्रवासात अजय शेलार यांनी कधीही तडजोड न करता सत्य मांडण्यावर भर दिला. त्यामुळेच टिटवाळा परिसरात त्यांची ओळख केवळ पत्रकार म्हणून नव्हे, तर समाजहितासाठी लढणारा सजग आवाज म्हणून निर्माण झाली आहे. आज ईशय गंभीर’सारख्या विडंबनात्मक माध्यमांतून समाज आणि राजकारणावर भाष्य होत असताना, त्या पाठीमागे उभ्या असलेल्या निर्भीड पत्रकारितेची परंपरा जपण्याचे काम अजय शेलार यांसारख्या पत्रकारांनी गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे केले आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

दिशा सालियान प्रकरण! उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; तर पुरावे दडपल्याचा संशय, मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चिमाजी आढावांचीही चौकशी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले होते…

‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन; लेकाच्या आवडीची आणली मूर्ती, जागृत महाराष्ट्रशी संवाद

‘ठरलं तर मग’ लोकप्रिय मालिकेतील अभिनेता अमित भानुशलीच्या घरी मोठ्या थाटात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. त्याच्या घरी दिड दिवसांचा बाप्पा बसतो.दरम्यान अमित जेव्हा बाप्पाला घरी आणण्याच्या तयारीत असताना जागृत महाराष्ट्रशी…

Leave a Reply

You Missed

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा