बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार,तारीख जाहिर; चित्रपटाबाबत मोठी घोषणा

नितेश तिवारी यांचा बहुप्रतिक्षित पौराणिक चित्रपट ‘रामायण’ बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटासाठी फारच उत्सुक आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून काही काळ बाकी असला तरी, त्याचा ट्रेलर मात्र आतापासूनच चर्चेत आला आहे.

रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता, निर्मात्यांनी प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली आहे.

‘रामायण’चा ट्रेलर या दिवशी प्रदर्शित होईल

‘रामायण’चे निर्माते नमित मल्होत्रा ​​यांनी नुकतेच त्यांच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल माहिती दिली आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “शुभ ब्रह्म मुहूर्तावर, गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी पहाटे ४:१५ वाजता, आम्ही ‘रामायण’च्या ट्रेलरचे जगभरात स्वागत करत आहोत.” म्हणजेच चित्रपटाचा ट्रेलर ३० जुलै रोजी, ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी प्रदर्शित होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Namit Malhotra (@iamnamitmalhotra)

चित्रपटाच्या टीमने नुकतेच दिल्लीत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी ट्रेलरची झलक दाखवण्यात आली आणि चित्रपटाच्या कलाकारांची पहिल्यांदाच ओळख करून देण्यात आली. हा चित्रपट सॅन दिएगो कॉमिक-कॉन २०२६ मध्ये देखील सादर करण्यात आला होता.

‘रामायण’ दोन भागांमध्ये प्रदर्शित केले जाईल 

नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग यावर्षी दिवाळीत, तर दुसरा भाग पुढील वर्षी २०२७ साली दिवाळीत प्रदर्शित होईल. रणबीर कपूर ‘राम’, साई पल्लवी ‘सीता’, सनी देओल ‘हनुमान’, यश ‘रावण’ आणि रवी दुबे ‘लक्ष्मण’ यांच्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे बजेट ४,००० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटावर जगभरातील हजारो कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी काम केले.त्यामुळे ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढणार आहे हे नक्की.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अभिनेता राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा लिलाव; डोक्यावर 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांचे चेक बाऊन्स प्रकरण अद्याप सुटलेले नाही.या प्रकरणामुळे राजपालच्या अडचणी पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर इथल्या त्याच्या दोन मालमत्तांचा लिलाव येत्या…

आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

बॉलिवूडमधून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. आमिर खानच्या ‘गजनी’ आणि ‘लगान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधील आपल्या दमदार अभिनयामुळे ओळख मिळवलेले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या…

Leave a Reply

You Missed

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार