अज्ञानी जनतेला जागृत करून सज्ञानी बनविणे, हे आपले उद्दिष्ट असावे. __ बी. बी. मेश्राम

फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनची १५३ वी शतकोत्तर वैचारिक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा संपन्न.

छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशन व दि ऑल इंडिया नाग असोसिएशन (आईना) च्या संयुक्त विद्यमाने “मी लोकशाहीचा पाठीराखा असून कोणत्याही आकारात आणि पद्धतीत असलेल्या एखाधिकारशाहीचा विघ्वंसक आहे.” या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गोलमेज परिषदेतील विधानाच्या ९४ व्या वर्धापन दिनानिमित्त सदरील ऐतिहासिक प्रासंगिक विषयावर १५३ वी शतकोत्तर वैचारीक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा संस्थेचे कार्यालय साकेत नगर, छत्रपती संभाजीनगर येथे १८ जानेवारी २०२६ ला संपन्न झाली.
फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनचे संचालक बी.बी. मेश्राम  म्हणाले की, १९ जानेवारी १९३१ ला गोलमेज परिषदेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच हे स्पष्ट केले होते की, एखाद्या देशाच्या राजकीय जीवनाचे सुसूत्रीकरण करण्याचे प्रयत्न करीत असताना उत्तरदायी शासन आणि प्रातिनिधिक सरकार या दोन बाबींना प्राथमिकता दिली पाहिजे. कुठल्याही देशातील जनतेवर राज्य करीत असताना जनतेला दारिद्र्यात ठेवून राज्य करणे आणि जनतेला दारिद्र्यातून बाहेर काढून राज्य करणे या दोन भिन्न बाबी आहेत. म्हणून जनतेने सभागृहात सक्षम प्रतिनिधी पाठविले पाहिजेत आणि त्या पुढार्‍यावरती जनतेने करडी नजर ठेवली पाहिजे. हे करण्यासाठी अज्ञानी जनतेला जागृत करून सज्ञानी बनविणे हे आपले उद्दिष्ट असायला हवे. करिता समग्र आंबेडकरवाद जनमानसावर बिंबविला पाहिजे. कुटुंब हा समाजाचा प्रमुख घटक असल्यामुळे ज्याची सुरुवात आपण आपल्या कुटुंबापासून केली पाहिजे. लोकशाहीची स्पष्टता कुटुंबातील सदस्यांना यावी म्हणून कुटुंबात संसदीय प्रणाली राबविली पाहिजे. समतायुक्त मानवतावादी समाज निर्माण करण्यासाठी देशव्यापी परिवर्तनवादाची चळवळ चालवीत असताना दक्षिण भारतात होऊन गेलेल्या आदर्शांना उत्तर भारतात तर उत्तर भारतात होऊन गेलेल्या आदर्शंना दक्षिण भारतात प्रचारीत आणि प्रसारित केले पाहिजे. तसेच २२ डिसेंबर १९५२ ला पुण्याच्या लाल लायब्ररीमध्ये दिलेल्या संदेशात या देशांमध्ये संसदिय लोकशाही टिकवायची असेल तर कुठल्या अटी आणि शर्ती यांचे पालन केले पाहिजे हे स्पष्ट केलेले आहे. त्याचे आपण अंमलबजावणी केली पाहिजे. जेणेकरून भारतीय नागरिकांचे परिवर्तनवादाच्या अनुषंगाने जनमत तयार होऊ शकेल. या बाबीचे समाज जीवनात संचलन व्हावे, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मी लोकशाहीचा पाठीराखा असून कोणत्याही आकारात आणि पद्धतीत असलेल्या एकाधिकारशाहीचा विघ्वंसक आहे, असे म्हटले होते. याची जनतेला प्रचिती यावी म्हणून आपण या प्रासंगिक विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे.

उद्घाटनपर मार्गदर्शन करताना फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनचे समन्वयक उद्योजक शशिकांत काळे म्हणाले की, नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत बिनविरोध प्रतिनिधी निवडण्याच्या प्रक्रियेवरून असं लक्षात येते की येणाऱ्या लोकसभेमध्ये सुद्धा खासदार बिनविरोध निवडून पाठविले जातील की काय? अशी शंकास्पद परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्यातील काही नेते मंडळी शत्रू सोबत हात मिळवणी करून चळवळीचे नुकसान करून घेत असतात. याची जाणीव ठेवून आपण मार्गक्रमण केले पाहिजे.
प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ॲड. सुनील कुमार नागवंश म्हणाले की, ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले असले तरी त्यांनी आपणास शिक्षणाची द्वारे खुली करून मानवी हक्क अधिकाराची जाणीव करून दिलेली आहे. या देशाला न्याय देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरच करू शकतात, याची जाणीव असल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना गोलमेज परिषदेत बोलावले होते. ज्यात आंबेडकरांनी आपले म्हणणे सभागृहाला पाठवून दिले ज्याला केवळ गांधींनी विरोध केला होता. परिणामी पुणेकरारातील तडजोडीनुसार स्वतंत्र मतदार संघाऐवजी नाईलाजाने संयुक्त मतदार संघ पद्धती स्वीकारावी लागले. करिता शिकल्या सवरलेल्या व्यक्तींनी राजकारणाकडे दुर्लक्ष करू नये.
याप्रसंगी महादेव डांबरे म्हणाले की, आपण साउथ बरो व सायमन कमिशन आणि गोलमेज परिषदेतील कार्यवाही समजून घेतली पाहिजे. डॉ. व्ही. एच. कांबळे म्हणाले की, चळवळीसाठी संसाधने उपलब्ध करून दिली पाहिजेत. ॲड. आर. एम. गायकवाड म्हणाले की, समाजातील कुठल्याही घटकाला दुर्लक्षित न करता सर्व वयोगटासाठी कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. कुटुंब हाच लोकशाहीचा प्रमुख घटक आहे. प्रा. डॉ. ए. आर. केवटे म्हणाले की, आपले विचार आणि आचरण हे पारदर्शक असावे. शासन प्रशासनावर परिणाम करणारी व्युहरचना असावी. उद्योजक मिलिंद बागुल म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कृतीतून लोकशाहीचा पाठीराखा घोषित करताना एकाधिकारशाहीचा विघ्वंसक असल्याचे सिद्ध केले. ॲड. विलास रामटेके म्हणाले की, चर्चेशिवाय निर्णय घेणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणे होय.
याप्रसंगी प्रा. शिवम गायकवाड यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती. सुरुवातीला आदर्शांना पुष्प व पुष्पमाला अर्पण करून स्टडी फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांचे व उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. ॲड. विलास रामटेके यांनी सूत्रसंचालन तर प्रास्ताविक प्रा. विलास कटारे यांनी व आभार प्रा. शिवम गायकवाड यांनी व्यक्त केले.

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६

मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६ ,द सोमय्या स्टोरीटेलिंग फेस्टिव्हल २०२६’ हा महोत्सव मुंबईतील सोमय्या विद्याविहार विद्यापीठाद्वारे आयोजित ‘अफसाना – द सोमय्या स्टोरीटेलिंग फेस्टिव्हल २०२६’…

हसत-हसत https://jagrutmaharashtra.com/Article3841/राजकारणाचा आरसा : ‘ईशय गंभीर’मधील पोपटलाल ठरला टिटवाळ्याचा जनआवाज निवडणूक काळात हवा केली पोपटलालच्या ईशय गंभीरने…

‘ईशय गंभीर’मधील पोपटलाल ठरला टिटवाळ्याचा जनआवाज http://टिटवाळा टिटवाळा : स्थानिक राजकारणात नेहमीच गंभीर चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळते. मात्र याच गंभीरतेला विनोद, विडंबन आणि बोचऱ्या वास्तवाची धार देत ‘ईशय…

Leave a Reply

You Missed

लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण सन्मानित

  • By Admin
  • March 18, 2026
लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण  सन्मानित

“रंजन गोगोईंचा ६ वर्षांचा हिशोब: काम शून्य, सुविधा पूर्ण?”

“रंजन गोगोईंचा ६ वर्षांचा हिशोब: काम शून्य, सुविधा पूर्ण?”

मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

  • By Admin
  • March 17, 2026
मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

पाकिस्तानचे 7 फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचले नाहीत,114 धावांत ऑलआउट

पाकिस्तानचे 7 फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचले नाहीत,114 धावांत ऑलआउट

मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

  • By Admin
  • February 27, 2026
मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

  • By Admin
  • February 23, 2026
मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

“झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

  • By Admin
  • February 13, 2026
“झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

  • By Admin
  • February 8, 2026
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना