माहिमच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्यविभाग आयोजित ‘नाट्यांश’ हा एकाकिकांचा महोत्सव माटुंगाच्या यशवंत नाट्यमंदिर नाट्यगृहात येत्या सोमवारी २७ तारखेला रंगणार आहे. या महोत्सवात रुपारेल नाट्यविभागाच्या एकूण तीन एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. ‘इथे नाव ठेवायला जागा नाही’, ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ आणि ‘संगीत स्वयंवर’ या तीन पुरस्कार विजेत्या एकांकिका तुम्हाला अगदी माफक तिकिट दरात या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहेत.
या महोत्सवात विलास पडळकर लिखित आणि कै. तुषार घाडीगावकर दिग्दर्शित ‘इथे नाव ठेवायला जागा नाही’ ही एकांकिका रूपारेलचे माजी विद्यार्थी सादर करणार आहेत. नमूद नमूद रूपारेलचे माजी विद्यार्थी कै. तुषार घाडीगावकर आणि कै. रणजीत पाटील यांच्या स्मरणार्थ सादर केली जाणार आहे. त्याचबरोबर इप्टा या स्पर्धेतील विजेती ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ ही एकांकिका रूपारेलची आजी-माजी विद्यार्थी मिळून सादर करणार आहेत. तसेच २०२३ रूपारेल साली आय.एन.टी. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संगीत विजेती म्हणून सन्मानित केलेली एकांकिका ‘संगीत स्वयंवर’ सुद्धा आपणास या महोत्सवात पाहायला मिळणार आहे.
मुळात ‘नाट्यांश २०२६’ या एकांकिका महोत्सवाचे हे पहिलेच वर्ष असून रूपारेलच्या नाट्यविभागातील विद्यार्थ्यांना यातून नाट्य क्षेत्रातील विविध कार्याचे अनुभव मिळावेत नवे धडे गिरवता यावेत तसेच रूपारेलच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आपल्या क्षेत्रातील अनुभवांचे आदान प्रदान करावे. शिवाय विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आपल्या मुलांच्या कलागुणांना पाहता यावे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.
या एकांकिका महोत्सवास रुपारेलचे माजी विद्यार्थी जे आज नाट्य व सिनेमा क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. ते कलाकार देखील या महोत्सवात हजेरी लावणार आहेत.
त्यामुळे आपण सर्वांनी देखील नाट्यांश महोत्सवाला नक्की या आणि विविध रसभावांनी सजलेल्या एकांकिकांचा अनुभव घ्या. अधिक माहितीसाठी आपण खालील क्रमांकावर संपर्क साधा – (इथे संपर्क टाका)








