मढ:जरीमरी माता मंदिरातून दोन सोन्याचे मंगळसूत्र चोरी; परिसरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्येही वाढ

मुंबई : मढ परिसरातील जरिमरी माता मंदिरातून दोन सोन्याचे मंगळसूत्र चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती भाजप कार्यकर्ते प्रमोद यादव यांनी जागृत महाराष्ट्र न्यूजला दिली.

प्रमोद यादव यांनी सांगितले की, जरिमरी माता मंदिरातील दोन सोन्याच्या मंगळसूत्रांची चोरी झाली असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

तसेच मढ येथील शिवाजी नगर गेट क्रमांक २ परिसरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोपही त्यांनी केला. नागरिकांच्या मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी समोर येत असून यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिस प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणांची तपासणी करावी आणि चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

मढ परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिस प्रशासन यावर कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे…

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

देशात सध्या ८०च्या दशकातील (1980s) ट्रेंड पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘80s AI Photo Trend’ तसेच त्या काळातील फॅशन आणि पॉप कल्चरशी संबंधित…

झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनापासून ढाब्यावरच्या त्या सोळा वर्षांच्या मुलापर्यंतचा प्रश्न…

खरकटी भांड्यांत हरवलेलं बालपण…. ज्या वयात त्याच्या हातात भविष्याची स्वप्नं, पुस्तकं आणि खेळण्याचं साहित्य असायला हवं होतं, त्या हातात जेवण झाल्यानंतर उरलेली खरकटी भांडी होती. एका हातात कापड होतं आणि…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक