लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासनाचा निर्णय; शाळा सकाळी 8 ते 12.30

लातूर : जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशानुसार, लातूर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची वेळ तात्पुरती बदलण्यात आली आहे.

नवीन आदेशानुसार, 23 जून 2026 पासून पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळा सकाळी 8.00 ते दुपारी 12.30 या वेळेत चालविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच सर्व खासगी व अनुदानित शैक्षणिक संस्थांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने लातूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर उष्णताजन्य आजारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी शाळांचे सकाळच्या सत्रात नियोजन करण्यात आले असून पालकांनी आणि शाळा व्यवस्थापनांनी या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी

    लातूर जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद निर्माण झाला असून, नव्याने करण्यात आलेल्या अकार्यक्षम सदस्यांच्या निवडी तातडीने रद्द करण्याची जोरदार मागणी ग्राहक चळवळीतील विविध संघटनांनी केली आहे. ‘ग्राहकतीर्थ…

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    शिक्षक दिनानिमित्त देशभरातली ८२ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवडण्यात आलं आलं होतं. त्यात महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या या…

    Leave a Reply

    You Missed

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी