‘मी अन् मुलं जात आहोत…’,सोशल मीडियावर स्टेटस ठेवला अन् शिक्षकाने लेकरांना घेऊन नदीत जीवन संपवलं

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे नांदेड जिल्हा हादरला आहे. एका जिल्हा परिषद शिक्षकानं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन निष्पाप मुलांसह कार थेट नदीत घेऊन गेले अन् जीवनयात्रा संपवली. अंदुरा परिसरातील नदीपात्रात ही कार आणि त्यात वडिलांसह त्या दोन लेकरांचेही मृतदेह आढळून आले. ही घटना शुक्रवारी दि.17 जुलै 2026 रोजी घडली असून या घटनेमुळे या घटनेमुळं संपूर्ण नांदेड जिल्हा आणि शिक्षण वर्तुळात तीव्र संताप व खळबळ उडाली आहे.

वरिष्ठांच्या जाचाला आणि छळाला कंटाळून दोन्ही मुलांसह आत्महत्या 

सुनील मोरे (वय ४२, रा. बेंबर, ता. भोकर) असे मृत शिक्षकाचे नाव असून, सारा आणि सुमित अशी मृत मुला-मुलीची नावे आहेत. सुनील मोरे हे हिमायतनगर येथील पोटा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक हृदयद्रावक स्टेटस ठेवला होता. त्या स्टेटसमध्ये,”मी माझ्या वरिष्ठांच्या जाचाला आणि छळाला कंटाळून माझ्या दोन्ही मुलांसह आत्महत्या करत आहे,” असा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला होता. हा स्टेटस पाहिल्यानंतर नातेवाईक आणि मित्रांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

विदारक दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले

शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अंदुरा येथील नदीपात्रात एक कार बुडाल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबात माहिती दिली.घटनेचं गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रशासनानं एनडीआरएफ आणि स्थानिक रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं.अनेक तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर एनडीआरएफच्या मदतीनं कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आलं आहे. कारचा दरवाजा उघडला असता, त्यात शिक्षक आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह आढळून आले. हे विदारक दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या वरिष्ठअधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया 

या घटनेची माहिती मिळताच नांदेडचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नदीपात्राजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले असून, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या त्या वरिष्ठअधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

तर लोकांना ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरावे लागेल; खारफुटीच्या ऱ्हासावर मुंबई उच्च न्यायालयाची अतिशय गंभीर चिंता!

मुंबई: “मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील खारफुटीच्या जंगलांचे (Mangroves) प्रमाण सातत्याने कमी होत चालले आहे. जर हे हरित आच्छादन असेच कमी होत राहिले, तर तो दिवस आता दूर नाही जेव्हा लोकांना…

उधारीचे पैसे मागितले म्हणून दुकान मालकाचा हातच मोडला,महाड शहरातील घटना,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

महाडमध्ये किरकोळ उधारीवरून दुकानदाराला बेदम मारहाण, खांदा सटकला; वाचवायला गेलेल्या पत्नीचाही विनयभंग! महाड: महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, आता एका किराणा दुकानदाराला किरकोळ उधारीच्या कारणावरून…

Leave a Reply

You Missed

‘मी अन् मुलं जात आहोत…’,सोशल मीडियावर स्टेटस ठेवला अन् शिक्षकाने लेकरांना घेऊन नदीत जीवन संपवलं

‘मी अन् मुलं जात आहोत…’,सोशल मीडियावर स्टेटस ठेवला अन् शिक्षकाने लेकरांना घेऊन नदीत जीवन संपवलं

‘आम्ही खूप विचार केला,पण…’ मराठीतील लोकप्रिय जोडप्याचा लग्नानंतर १५ वर्षानंतर घटस्फोट;सोशल मीडियावर पोस्ट, चाहत्यांना धक्का

‘आम्ही खूप विचार केला,पण…’ मराठीतील लोकप्रिय जोडप्याचा लग्नानंतर १५ वर्षानंतर घटस्फोट;सोशल मीडियावर पोस्ट, चाहत्यांना धक्का

तर लोकांना ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरावे लागेल; खारफुटीच्या ऱ्हासावर मुंबई उच्च न्यायालयाची अतिशय गंभीर चिंता!

तर लोकांना ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरावे लागेल; खारफुटीच्या ऱ्हासावर मुंबई उच्च न्यायालयाची अतिशय गंभीर चिंता!

उधारीचे पैसे मागितले म्हणून दुकान मालकाचा हातच मोडला,महाड शहरातील घटना,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

उधारीचे पैसे मागितले म्हणून दुकान मालकाचा हातच मोडला,महाड शहरातील घटना,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

गोवंश हत्या बंदी कायदा: सुप्रीम कोर्टाकडून तमिळनाडूत स्थगिती

गोवंश हत्या बंदी कायदा: सुप्रीम कोर्टाकडून तमिळनाडूत स्थगिती

भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला

भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला

व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! औंढा नागनाथ तालुक्यात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! औंढा नागनाथ तालुक्यात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड

Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड