मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

मराठवाड्यातील नागरिकांसाठी आता गुड न्यूज आहे. रेल्वे प्रवाशांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.  लवकरच मराठवाड्यात ‘वंदे भारत’ धावणार आहे.
दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी-मुदखेड या अत्यंत वर्दळीच्या दुहेरी रेल्वे मार्गाचा कायापालट होणार आहे.  भारतीय रेल्वेने या मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल 163 कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे भविष्यात या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेससारख्या अतिवेगवान गाड्या चालवणे अधिक सुलभ होणार आहे.

रेल्वे ट्रॅक किलोमीटर मार्गावरील जुनी वीज यंत्रणा पूर्णपणे बदलली जाणार

या 163 कोटी रुपयांच्या प्रकल्पाअंतर्गत 164 रेल्वे ट्रॅक किलोमीटर मार्गावरील जुनी वीज यंत्रणा पूर्णपणे बदलली जाणार आहे. सध्या या मार्गावर कार्यरत असलेली 1×25 केव्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्शन प्रणाली काढून त्याऐवजी अत्याधुनिक आणि उच्च क्षमतेची 2×25 केव्ही प्रणाली बसवली जाईल.

रेल्वेगाड्यांना विनाअडथळा आणि अखंड वीजपुरवठा मिळेल

वाढीव वीजभार हाताळण्यासाठी वीज उपकेंद्रे आणि इतर पायाभूत सुविधांचेही आधुनिकीकरण केले जाणार आहे. यामुळे रेल्वेगाड्यांना विनाअडथळा आणि अखंड वीजपुरवठा मिळेल, ज्यामुळे तांत्रिक बिघाड कमी होऊन गाड्यांचा वेग वाढेल.

औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्राला मोठा फायदा

परभणी-मुदखेड हा रेल्वे मार्ग भारतीय रेल्वेच्या अत्यंत व्यस्त मानल्या जाणाऱ्या ‘हायली युटिलाइज्ड नेटवर्क’ चा भाग आहे. हा मार्ग अजमेर, इंदूर, खंडवा, अकोला, पूर्णा, मुदखेड, सिकंदराबाद, मेहबूबनगर आणि धोन या महाराष्ट्रासह इतर राज्यांतील प्रमुख शहरांना जोडतो. त्यामुळे या मार्गाची क्षमता वाढल्याने केवळ प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार नाही, तर मालवाहतुकीलाही मोठी गती मिळून स्थानिक व्यापार आणि उद्योगांना मोठा फायदा होणार आहे.

मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत

मार्गाच्या या आधुनिकीकरणामुळे उच्च वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्या अधिक सुरक्षितपणे चालवता येतील. तसेच मालवाहतूक गाड्यांची क्षमता वाढल्याने भारतीय रेल्वेला 2029-30 पर्यंत 3000 दशलक्ष टन मालवाहतुकीचे ठेवलेले राष्ट्रीय उद्दिष्ट गाठणे सोपे जाणार आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    मुखदर्शन असो वा चरणस्पर्श, ‘नवसाला पावणारा’ म्हणून ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक लालबाग-परळच्या गल्लीबोळात दाखल होत असतात. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक तासनतास, अगदी दिवस-दिवस…

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सध्या एकाच नावाचा आणि एकाच दौऱ्याचा दबदबा पाहायला मिळत आहे आणि तो म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड लोकसभा संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांचा.…

    Leave a Reply

    You Missed

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब